WTC 2023 Final India vs Australia: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव स्मिथ यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून १५१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट आहे. अजूनही भारत ऑस्ट्रेलियाने केलेल्या धावसंख्येच्या तुलनेत ३१८ धावांनी मागे आहे. टीम इंडियाला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी २६९ धावांची गरज आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून १५१ धावा केल्या आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे
भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा १५ धावा, शुबमन गिल १३ धावा, चेतेश्वर पुजारा १४ धावा, विराट कोहली १४ धावा करून बाद झाला. ७१ धावांपर्यंत भारताने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर रवींद्र जडेजा
तत्पूर्वी, गुरुवारी ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि एकूण १४२ धावांची भर घातल्यानंतर ते सर्वबाद झाले. ट्रॅव्हिस हेड १६३ धावांवर बाद झाला. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील ३१वे शतक झळकावले. तो १२१ धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीन सहा धावा, अॅलेक्स कॅरी ४८ धावा, मिचेल स्टार्क पाच धावा, पॅट कमिन्स नऊ धावा आणि लियॉन नऊ धावा करून बाद झाले.दुसरीकडे बुधवारी पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने ४३ आणि मार्नस लाबुशेनने २६ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद शमी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.