Premium

गणेश चतुर्थीनिमित्त परफेक्ट महाराष्ट्रीयन लूक कॅरी करायचा आहे? मग फॉलो करा ‘या’ ६ टिप्स

Ganesh Chaturthi Maharashtrian Outfits Ideas: गणेश चतुर्थीला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. अनेक ठिकाणी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जात आहे. या काळात महिला महाराष्ट्रीयन लूकला प्राधान्य देताना दिसतात. यामुळे जाणून घेऊ या लूकसाठी काय गोष्टींची गरज असते.

ganesh chaturthi maharashtrian outfits ideas
गणेश चतुर्थीनिमित्त परफेक्ट महाराष्ट्रीयन लूक हवाय? मग फॉलो करा 'या' ६ टिप्स (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)

Ganesh Chaturthi 2023 Fashion Tips: गणेश चतुर्थी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. हा सण महाराष्ट्रीय संस्कृतीशी निगडित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अगदी पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा होतो. यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. यादिवशी प्रत्येकाच्या घरी बाप्पाचे आगमन होईल. यादिवशी घरातील महिला बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी करतात. विशेष म्हणजे अनेक महिला या दिवसांत सुंदर दिसण्यासाठी महाराष्ट्रीयन लूकला खूप पसंत देतात. महाराष्ट्रीयन नववारी साडी किंवा सहावार पैठणी साडी, पारंपारिक दागिने, केसांचा अंबाडा, कपाळावर चंद्रकोर अशा अनेक पारंपारिक आभूषणांच्या मदतीने महाराष्ट्रीयन लूक पूर्ण केला जातो. त्यामुळे यंदा तुम्हीही महाराष्ट्रायन लूक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर खालील टिप्स फॉलो करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) महाराष्ट्रीयन साडी

महाराष्ट्रात एकापेक्षा एक पारंपारिक साडीचे लुक पाहायला मिळतात. मराठी स्त्रिया नऊवारी साडी घालतात. नऊवारी म्हणजे नऊ फूट लांब असलेली साडी. याशिवाय शालू आणि पैठणी साडी देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परिधान केली जाते. अशा साड्यांवर सुंदर फुलं आणि नक्षीकाम काम पाहायला मिळतं. जर तुमच्याकडे अशा साड्या नसतील तर तुम्ही कोणत्याही बॉर्डर असलेली साडी किंवा सिल्क साडीसोबत महाराष्ट्रीयन लुक कॅरी करु शकता.

२) कपाळावर चंद्रकोर

महाराष्ट्रीय लूकमध्ये कपाळावरील टिकलीला फार महत्व असते. यामुळे तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये खूप आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही कपाळावर चंद्रकोर टिकली लावणे फार महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चंद्रकोर टिकलीची साइज निवडू शकता.

३) महाराष्ट्रीयन नथ

भारतीय परंपरेत स्त्रिया नाक टोचतात. यात महाराष्ट्रात अनेक स्त्रिया सणासुदीला नाकात वेगवेगळ्या प्रकारच्या नथ घालतात. या नथीचा प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता.

४) ठुशी

दागिण्यांशिवाय अस्सल महाराष्ट्रीयन लूक पूर्ण होणे शक्यच नाही. यामुळे महाराष्ट्रीयन लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही गळ्यात ठुशी हा पारंपारिक दागिना घातला पाहिजे. हा एक प्रकारचा पारंपारिक दागिना असून तो दिसायला खूप सुंदर दिसतो. याशिवाय तुम्ही कोल्हापूर साज, लक्ष्मी हार, बोर माळ असे महाराष्ट्रातील इतर दागिनेही परिधान करु शकता.

५) बुगडी

नथ आणि बुगडी हे महाराष्ट्रीय लूकमध्ये शोभून दिसणारे दागिने आहेत. तुम्ही नाकात तुमच्या आवडीप्रमाणे बुगडी घालू शकता. यामुळे स्त्रीच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तुम्हाला बुगडीमध्येही मोतीपासून ते गोल्डपर्यंत अनेक पर्याय आहेत.

६) महाराष्ट्रीय चुडा आणि गजरा

केसांमध्ये गजरा आणि हातात बांगड्यांचा हिरवा चुडा याशिवाय महाराष्ट्रीय लूक अपूर्ण आहे. गजरा बांधलेले केस हे महाराष्ट्रीय स्त्रियांची शान आहे. अनेक स्त्रिया केसांचा अंबाडा घालतात, ही पण एक महाराष्ट्रीय हेअरस्टाइल आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 styling maharashtra look is best for ganesh chaturthi keep these 6 things with you to follow it sjr

First published on: 11-09-2023 at 10:47 IST
Next Story
Kitchen Jugaad: झोपण्याआधी गॅसवर ठेवा फक्त २ प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही