Hot Rock Tadaka Viral Video: सोशल मीडियाच्या काळात अनेकदा जुन्या परंपरा नव्याने जगासमोर येतात, कधी त्याच ट्रेंड होतात तर कधी ट्रोल होतात पण या ना त्या मार्गाने चर्चेत मात्र असतात. अशीच एक ट्रेंडिंग हॅक म्हणजे डाळ- आमटीला दगडाची फोडणी देणे. ऑनलाईन क्रिएटर, वाणी अग्रवाल यांनी महाराष्ट्रातील ‘ठिकरी फोडणी’ ची पद्धत समजावून सांगितली होती, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण खरोखरच अशा प्रकारे आमटीच्या फोडणीत दगड वापरणे हे सुरक्षित आहे का? वापर नेमका कसा करावा व त्याने काय फायदे तोटे होऊ शकतात हे पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्रवाल यांनी सांगितले की, आमटी नेहमीसारखी शिजवून घेऊन मग फोडणीच्या भांड्यात लहान स्वच्छ दगड घ्या व त्यावर थोडा चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून गरम करा. मग यावर तेल घाला. तुम्ही एरवी फोडणीमध्ये जेवढं तेल वापराल त्याच्या अर्धे तेल वापरायचे आहे. ही फोडणी शिजवलेल्या डाळीत मिसळा, याला मस्त स्मोकी आणि खमंग चव येते. भाताबरोबर ही आमटी मस्त लागते

क्लिनिकल आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ गुरकिरत कौर म्हणतात की, ‘हॉट रॉक’ तडका घालताना सर्वप्रथम विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या खडकाचा प्रकार. खडकांमध्ये विविध खनिजे असू शकतात, त्यातील काही दगड उच्च तापमानात विषारी धूर सोडू शकतात. उदाहरणार्थ, एस्बेस्टोस किंवा इतर हानिकारक खनिजे असलेले खडक गरम केल्यावर कर्करोगजन्य पदार्थ सोडू शकतात. म्हणून, दगड निवडताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि धूळ काढून टाकण्यासाठी वापरण्यापूर्वी दगड नीट स्वच्छ करावा.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उष्णतेला संवेदनशील असणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी या दगडामुळे नष्ट होतील अशी भीती असते. पण फोडणी डाळीमध्ये शिजवण्याच्या प्रक्रियेच्या शेवटी घातली जात असल्याने, व्हिटॅमिन्स उच्च उष्णतेच्या संपर्कात येण्याची वेळ तुलनेने कमी असते व परिणाम कमी असू शकतो. ‘हॉट रॉक’ तडका तुमच्या डाळ किंवा आमटीत अधिक चव आणू शकतो. गरम दगड जेव्हा कांदे आणि लसूण यांसारख्या तडका घटकांच्या संपर्कात येतो तेव्हा ते मेलर्ड प्रतिक्रिया सुरू होऊ शकते. यामुळे पदार्थांमधील अमिनो ॲसिड आणि साखरेचे प्रमाण कमी होते व चव खुलून येते.

दगडाच्या फोडणीचे फायदे

सामान्यतः फोडणीमध्ये तेल अधिक प्रमाणात वापरले जाते पण दगडाने तेल कमी प्रमाणात वापरले जाते. तेलाचा कमीत कमी प्रमाणात वापर केल्यास आहारात फायदेशीर फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स जोडण्यात मदत होते मात्र कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादित राहते.

हे ही वाचा<< आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

दगडाच्या फोडणीचे धोके

योग्य दगड शोधणे व त्याची स्वच्छता करणे हे वेळखाऊ काम ठरू शकते. तसेच ही पद्धत गावाकडे किंवा चुलीवर केल्यास सोयीस्कर ठरू शकते पण दगड गरम करण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि प्रयत्न करावे लागू शकतात. थोडक्यात काय तर कधीतरी प्रयोग म्हणून अशी फोडणी करू शकतो पण रोजच्या रोज असा प्रयोग वेळखाऊ व खर्चिक ठरू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adding hot rock in tadka dal how much oil to use for spicy curry or misal health benefits of using rock in food trending today svs