Benefits Of Eating Mango : उन्हाच्या झळा सहन करूनही उन्हाळा आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आंबा! हापूस, पायरी, तोतापुरी, रायवळ वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांनी उन्हाळाचा सहन करण्याचं मानसिक बळ मिळतं असं म्हणता येईल. पण जर तुम्हाला सांगितलं की हा आंबा जर एका विशिष्ट पद्धतीने खाल्ला तर त्याचा तुमच्या शरीराला सुद्धा भरपूर फायदा होऊ शकतो. ही पद्धत म्हणजे ‘मँगो स्प्राऊट्स’. नाव वाचून पण फॅन्सी वाटलं ना, पण खरंतर ही रेसिपी बनवायला अगदीच सोपी आहे. आज आपण ही रेसिपी, त्याचे फायदे व तज्ज्ञांनी दिलेली माहिती सर्व काही जाणून घेणार आहोत. चला सुरु करूया..

पोषणतज्ज्ञ सांगतात की, मँगो स्प्राऊट्स म्हणजे खरंतर सॅलेडचाच एक प्रकार आहे. आपण मोड आलेले मूग उकडून किंवा वाफवून त्यात काकडी, टोमॅटो, भोपळी मिरची, तिखट हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस असं सगळं घालून जसं साध्या बोरिंग सॅलेडला चविष्ट बनवतो त्यातच आंब्याचे काप घालून आणखी चविष्ट ट्विस्ट जोडायची ही पद्धत आहे. अर्थात हे सॅलेड संपूर्ण जेवण नसून तुमच्या संतुलित पोषक आहाराचा एक भाग ठरू शकते.

Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

यशोदा हॉस्पिटल्स हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ दिलीप गुडे यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की , “आंबा आणि मोड आलेल्या मुगाच्या सॅलेडचा कॉम्बो हा जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा साठा असू शकतो.”

यालाच अनुमोदन देत डॉ. संगीता तिवारी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आर्टेमिस लाइट, NFC यांनी सांगितले की, उन्हाळ्यात हे आंबा व मुगाचे सॅलड खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पाण्याचे प्रमाणही जास्त असते, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तर मोड आलेली कडधान्य प्रथिने, फोलेट, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषकसत्वांनी समृद्ध असतात. क्लिनिकल आहारतज्ज्ञ P.D.हिंदुजा हॉस्पिटल आणि MRC च्या चैताली राणे, यांनी याविषयी सांगितले की, मोड आलेल्या मुगाने शरीराची पचनक्षमता वाढण्यास मदत होते.

आंबा आणि मुगाचा कॉम्बो नक्की कशी मदत करतो?

चैताली राणे सांगतात की, आंबा आणि मुगाचा कॉम्बो हा मधुमेहविरोधी मानला जातो. यात अँटीऑक्सिडंट सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः आंब्यामुळे वाढणारी रक्तातील साखर हे मुगाच्या प्रभावामुळे आटोक्यात राहते. जर तुम्ही ब्रेकफास्टच्या वेळी आंबा, स्प्राउट्स आणि लिंबू एकत्र खात असाल तर सकाळी फायटोकेमिकल्स, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्तम पुरवठा शरीराला होतो. तसेच गाजर, काकडी, कांदा आणि आंबा आणि स्प्राउट्स यांचे परिपूर्ण मिश्रण आवश्यक फायबर प्रदान करते.

डॉ. तिवारी सांगतात की, यामध्ये आपण काकडी, टोमॅटो, बीटासारख्या हायड्रेटिंग भाज्या जोडल्यास शरीराची ऊर्जा कायम राहू शकते. आंबा आणि मोड आलेल्या मुगामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व रोगांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच डॉ. गुडे यांनी म्हटले की, मँगो स्प्राउट्स सॅलडमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, वजन नियंत्रित करू इच्छिणाऱ्यांसाठी तर हा एक उत्तम पर्याय ठरतो.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम चवळीच्या भाजीत दडलंय काय? वजन, कोलेस्ट्रॉल कमी करताना कशी होते मदत, खाल्ल्यावर एवढं करा की..

@SaloniA या अकाउंटवर शेअर करण्यात आलेली मँगो स्प्राऊट्सची ही रेसिपी पाहा

साहित्य

२ कप – वाफवलेले स्प्राउट्स
१ नाही – तुमच्या आवडीचा आंबा
१ नाही – कांदा, चिरलेला
१ नाही – टोमॅटो, चिरलेला
१ कप – उकडलेला मका
लिंबू
दीड टीस्पून – मीठ
अर्धा टीस्पून – काळी मिरी
अर्धा टीस्पून – मिरची पावडर
अर्धा टीस्पून – चाट मसाला
चिरलेली कोथिंबीर

पद्धत

सगळे पदार्थ नीट मिसळून खा.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व तुम्ही या उन्हाळ्यात असा प्रयोग करून पाहणार का हे नक्की सांगा.