Stress & lack of sleep leading to bloating : पोट फुगणे ही एक सामान्य पचन समस्या आहे; ज्याची कारणे बैठ्या जीवनशैलीपासून ते आतड्यांपर्यंतच्या आरोग्य समस्यांपर्यंत दडलेली आहेत. कुठेतरी बाहेर जाताना किंवा अगदी जेवल्यावरसुद्धा आपलं पोट टम्म फुगलेलं दिसतं. तुमच्या दररोजच्या काही सवयींमुळेसुद्धा तुम्हाला पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. तर याचं नेमकं कारण काय? तर याचसंबंधित अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तर
पोट फुगणं ( Bloating) म्हणजे त्याचा आकार मोठा दिसणं. पोटात गॅस अडकल्यामुळे हा आकार मोठा दिसतो. कधी कधी हे पोट अगदी फुग्यासारखं किंवा गर्भवतीच्या पोटासारखं दिसतं. पण हे अत्यंत अस्वस्थ व वेदनादायकदेखील असू शकतं. लहान मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत पोट दुखणं ही एक सामान्य बाब आहे. तर सारखं पोट फुगल्यासारखं का वाटतं हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसनं लाइफस्टाइल कन्सल्टंट डॉक्टर अक्षत चढ्ढा यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरांनी एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काही प्रमुख कारणं नमूद केली आहेत; ज्यामुळे एखाद्याला वारंवार पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.
एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं (Bloating) वाटतं. पण, हे सतत होत असेल, तर तुम्ही स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. तपासून घेतल्यानंतरही पोट फुगण्याची समस्या कायम राहिल्यास, तुम्हाला कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल, असे डॉक्टर अक्षत चढ्ढा यांनी सांगितले आहे.
पोट फुगल्यासारखे (Bloating) वाटण्याची कारणे खालीलप्रमाणे :
जास्त वेळ बसणे
घट्ट कपडे, विशेषतः जीन्स किंवा घट्ट पँट घालणे
च्युइंगम खाणे
शिजविलेल्या जेवणाबरोबर फळे खाणे
वेगाने पाणी पिणे
जेवताना बोलणे
अन्न खाताना सतत पाणी पिणे
वेगाने जेवणे
अन्नामध्ये प्रो-बायोटिक्सचा अभाव असणे
अल्कोहोल, विशेषतः बीअर (आणि सर्व प्रकारचे धूम्रपान)
बद्धकोष्ठता आदी समस्या पोट फुगल्यासारखे वाटण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
हैदराबादमधील लकडी का पुल, ग्लेनेगल हॉस्पिटल्स येथील डॉक्टर नदेंडला हजारथैया (कन्सल्टंट सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, जीआय ऑन्कोलॉजी, एचपीबी व बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व ॲडव्हान्स लॅपरोस्कोपिक सर्जन) यांनी सांगितले की, कृत्रिम गोड पदार्थ, सॉर्बिटॉल व एस्पार्टेम यांसारखे पदार्थ आतड्यांमधे आंबू शकतात. त्यामुळे ब्लोस्टिंग, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. आरोग्यदायी असतानादेखील बीन्स, मसूर, संपूर्ण धान्य यातील जास्त फायबरमुळे काही व्यक्तींमध्ये गॅस आणि सूज यांच्या समस्या उद्भवू शकतात.
मुंबई आणि हैदराबाद स्थित, रा. स्किन ॲण्ड एस्थेटिक्स, कॉस्मेटिक डर्माटॉलॉजिस्ट,डॉक्टर रश्मी शेट्टी, यांनी सांगितले की, पोट फुगणे (Bloating) ही केवळ तुम्हाला जाणवणारी अवस्था नाही, तर हे बऱ्याचदा आतड्यात जळजळ होण्याचे सुरुवातीचे कारण असते. जर ही समस्या तुम्ही डॉक्टरांकडून वेळीच तपासून घेतली नाही, तर शारीरिक दाह (inflammation), लीकी गट सिंड्रोम (leaky gut), ॲसिड रिफ्लक्स (acid reflux) यांसारख्या गंभीर समस्यांमध्ये वाढू होऊ शकते. डॉक्टर शेट्टी म्हणाले, “ब्लोटिंग/ पोट फुगण्याची समस्या हा तुमच्या शरीरानं दिलेला एक सिग्नल आहे की, तुमचं शरीर तुम्ही खात असलेल्या पदार्थांशी सहमत नाही.” तसेच असहिष्णुता (इन्टॉलरन्स) बहुतेकदा पोट फुगल्याच्या रूपात दिसून येते आणि ती प्रत्येक व्यक्तीच्या विविध खाद्यपदार्थांच्या सेवनावर अवलंबून असते.
डॉक्टर शेट्टी यांच्या मते, “जेव्हा लोक योग्य मार्गदर्शनाशिवाय प्री-बायोटिक्स किंवा इतर पूरक आहार घेतात किंवा त्यांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या आतड्यांपेक्षा खूप वेगळ्या असतात तेव्हा या समस्या त्यांना जाणवू शकतात. ताणतणाव, झोपेची कमतरता, आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये आणखी व्यत्यय आणू शकतात; ज्यामुळे पोटाला सूज ( Bloating) येऊ शकते,” असे डॉक्टर शेट्टी म्हणाले.
डॉक्टर शेट्टी यांनी पुढे नमूद केले की, आतडे-त्वचेचा ॲक्सस हा आपल्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. “जेव्हा या समस्या तुमचे आतड्यांना सहन होत नाहीत, तेव्हा त्या त्वचेद्वारे प्रकट होऊ शकतात. संभाव्यत: एक्झिमा, सोरायसिसवर नियंत्रण नसणे, पुरळ किंवा सूजलेली त्वचा यांसारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. हे कनेक्शन म्हणूनच आतड्यांचं आरोग्य निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि एकूणच आरोग्यावर होऊ शकतो,” असे डॉक्टर शेट्टी म्हणाले.