रिकाम्यापोटी अँटिऑक्सिडंट्स असणारे पेय पिणे आरोग्याच्या दृष्टीने आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते असे म्हणतात. परंतु, मळमळ किंवा पचनाच्या काही तक्रारी असल्यास चटकन मदत करणाऱ्या आल्याबद्दल मात्र फार कमी प्रमाणात बोलले जाते. आहारतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांच्या मते, आल्याच्या रसात अँटीइंफ्लेमेटरी घटक असून अनेक काळापासून याचा वापर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी केला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आल्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे, पोटाची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी त्यासोबतच मळमळ किंवा इतर त्रासांपासून सुटका करण्यास आल्याची मदत होते, हा सर्वांना माहीत असणारा नैसर्गिक उपाय आहे. अभ्यासानुसार, आल्यामध्ये असणाऱ्या जिंजरॉलसारख्या बायोॲक्टिव्ह घटकांमुळे अँटीइंफ्लेमेटरी परिणाम होण्यास मदत होते; जे पचन सुरळीत करण्यात, मळमळ घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे या पदार्थाचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते”, अशी माहिती आहारतज्ज्ञ पूजाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर दिली आहे.

हेही वाचा : दही खाणे आरोग्यासाठी खरंच चांगले असते का? काय आहे डॉक्टरांचं मत जाणून घ्या…

परंतु, आल्याच्या रसाचा खरंच फायदा होतो का?

“आयबीएस [IBS-Irritable bowel syndrome] आणि आयबीडी [IBD- Inflammatory bowel disease] रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारी व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, रिकाम्यापोटी आल्याचा रस पिणे हा केवळ एक ट्रेंड नसून, याची मुळं पचनाच्या आणि निरोगी जीवनाच्या अभ्यासामध्ये पूर्वीपासून ते आत्ताच्या आधुनिक समजांमध्ये असल्याचे आपण पाहू शकतो”, असे हरिद्वारच्या एमपी, अधिकृत आहारतज्ज्ञ, होलिस्टिक हेल्थ आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायप्रमुख, एकांतामधील [MP, registered dietitian and head of holistic health and International business, Ekaanta, Haridwar] मानवी लोहिया यांचे म्हणणे आहे. असे इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

आल्यामध्ये सक्रिय असणारे जिंजरॉलचे घटक एंझाइमसाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करते, ज्यामुळे पोटातील पोषक घटकांचे विघटन होते आणि ते शरीरात शोषून घेण्याच्या प्रक्रियेला मदत होते. “याचा वापर करणे म्हणजे, सकाळी पोटाला दिवसभर उत्तम कार्य करण्यासाठी सकारात्मकता देण्यासारखे आहे. दुसरे म्हणजे, अस्वस्थपणा. पोटाचा अस्वस्थपणा घालवण्यासाठीदेखील अनेक जण आल्याला पसंती दर्शवतात”, असे लोहिया यांचे म्हणणे आहे.

“आल्याच्या रसाच्या सेवनाने, पोटामध्ये जाणवणारा अस्वस्थपणा, मळमळ किंवा पोटामध्ये बिघाड असल्यास त्यापासून आराम मिळतो. यासोबतच आल्यामध्ये असणाऱ्या अँटीइंफ्लेमेट्री घटकांमुळे शरीरात होणारी जळजळ किंवा आग कमी करण्यासठी आले फायदेशीर असते”, अशी माहिती आर अँड डी हेल्थीफायच्या पोषण विभागाच्या प्रमुख, अल्फा मोमाया यांनी सांगितली असून सोबत गरोदर महिलेला पोटात होणाऱ्या अस्वस्थता किंवा मळमळ यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी आले फायदेशीर ठरू शकते. अशी माहितीदेखील दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून समजते.

हेही वाचा : क्रिती सेननलादेखील आवडतो ‘बटर मेथी पराठा’; काय आहेत याचे सहा आरोग्यदायी फायदे पाहा…

लोहिया यांच्या म्हणण्याला सहमती देत, आल्याच्या रसाचे अनेक उपयुक्त फायदे असून याचा विशेष फायदा हा पचनसंस्थेसाठी होत असतो असे डॉक्टर दिलीप गुडे म्हणतात. “आल्याच्या रसात असणाऱ्या विविध अँटीऑक्सिडंट घटकांमुळे पोटातील जळजळ कमी होते, त्याचबरोबर गॅस्ट्रो एसोफेजल रिफ्लेक्सलासुद्धा कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे, तर उलट्या होणे, मळमळ यांसारख्या गोष्टी कमी करण्यास फायदेशीर ठरते. पोट साफ न होण्याच्या त्रासदायक त्रासापासून ते पोटामध्ये अल्सरसारख्या समस्यांवरसुद्धा आल्याचा अर्क गुणकारी असू शकतो”, अशी माहिती डॉक्टर गुडे देतात. डॉक्टर दिलीप गुडे हे हैद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आहेत.

आल्याचा रस रिकाम्यापोटी पिणे फायदेशीर आहे का?

लोहिया यांनी ‘अमेरिकन फॅमिली फिजिशियनमध्ये दिलेल्या अहवालानुसार “केमोथेरपीदरम्यान जाणवणारी मळमळ कमी करण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग होऊ शकतो”, अशी माहिती मिळते. हा रस जर रिकाम्यापोटी प्यायला तर पोटाच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होऊन आल्यात असणाऱ्या घटकांमुळे पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यास खूप उपयुक्त ठरू शकते असेदेखील त्या म्हणतात. त्यासोबतच आल्यामध्ये असणारे अँटीइंफ्लेमेटरी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरतात.

“सध्याच्या जगात ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळीचा त्रास हा जिथे टाळता न येण्यासारखा आहे, तिथे आले हे तुमची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे. कारण- रिकाम्यापोटी आल्याचे सेवन केल्याने त्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट घटक हे तुमच्या पोटाची विशेष काळजी घेतात. या रसाचा थेट संबंध आतड्यांमधील म्युकोसाशी [mucosa-श्लेष्मल त्वचा] होत असल्याने तुमच्या पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावते आणि दिवसभरात येणाऱ्या विषारी घटकांपासून रक्षण करत असते, असे लोहिया म्हणतात.

परंतु, रिकाम्यापोटी आल्याचे सेवन करणे हे सर्वांसाठीच उपयोगी असेल असे नाही. याउलट काहींना असे केल्याने त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे निसर्ग जरी आपल्याला आजारांवर नैसर्गिक उपाय देत असला, तरीही आपल्याला त्या झेपतील की नाही याचा विचार करून मगच उपयोग करावा, असेही लोहिया यांचे मत आहे.

हेही वाचा : हिवाळ्यात वजन ते पचन दोघांचीही काळजी घेतील ही सहा ‘फळं’! काय आहेत उपयुक्त टिप्स पाहा….

कोणत्याही आहारामध्ये बदल करत असताना अशा उपायांना रामबाण उपाय न मानता माहितीसाठी पूरक उपाय म्हणून विचार केला पाहिजे.

जर तुम्ही रिकाम्यापोटी आल्याचा अर्क/रस सहा ग्रॅम्सपेक्षा अधिक प्रमाणात घेतलेत तर मात्र, छातीत जळजळ, पोटात अस्वस्थपणा जाणवू शकतो, अशी अतिरिक्त माहिती डॉक्टर दिलीप गुडे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does drinking ginger juice empty stomach helps for digestion what are the health benefits check out dha
First published on: 31-12-2023 at 20:19 IST