Ajwain Tea Benefits: पचनासाठी अत्यंत गुणकारी असा मानला जाणारा ओवा हा वर्षानुवर्षे प्रत्यक्ष घरात हक्काचं स्थान मिळवून राहत आहे. आज आपण ओव्याच्या चहाचे काही फायदे पाहणार आहोत. आयुर्वेदिकदृष्ट्या रोज सकाळी किंवा रिकाम्या पोटी आपण या चहाचे सेवन केल्यास विशेषतः उन्हाळयात अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. हे लाभ कोणते? ओव्याचा चहा नेमका कुणी प्यावा? ओव्याच्या चहाचे सेवन करण्याबाबत कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी आपण तज्ज्ञांचं सविस्तर मत जाणून घेऊयात.

ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) डॉ मिथुन रमेश पवार, एमडी आयुर्वेद, जिल्हा आयुष अधिकारी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, चहाच्या रूपात ओव्याचे सेवन केल्याने पाचक एन्झाईम्स उत्तेजित होण्यास मदत होते आणि पोट फुगणे, गॅस, अपचन आणि उष्णतेच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.

2) यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील सल्लागार जनरल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ रंगा संतोष कुमार यांनी देखील ओव्याच्या चहाची पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.

3) भूक वाढवणे: काही अभ्यासांनी सुचवले आहे की ओव्याचा चहा भूक उत्तेजित करू शकतो. उष्णतेमुळे अनेकदा खाण्याची इच्छा कमी होते त्यावर हा चांगला उपाय ठरू शकतो असे डॉ कुमार यांनी नमूद केले.

4) चयापचयाला समर्थन: ओव्यांमध्ये चयापचय वाढवणारे गुणधर्म असल्याचे मानले जाते,यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अर्थात, या प्रभावाची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

5) श्वासोच्छवासावर नियंत्रण: ओव्याच्या चहामुळे खोकला आणि नाक बंद होणे यापासून आराम मिळू शकतो. डॉ पवार यांच्या मते, उन्हाळ्यात काहीवेळा ऍलर्जीमुळे असे त्रास होऊ शकतात, त्यावर ओव्याचा चहा आराम देऊ शकतो.

ओव्याचा चहा पिताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

मर्यादित संशोधन: ओव्याच्या फायद्यांबाबत काही अभ्यासांमध्ये माहिती समोर आली असली तरी डॉ. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ओव्याच्या चहाची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी अधिक उच्च दर्जाच्या संशोधनाची गरज आहे.

रिकाम्या पोटी चहाचे सेवन: पचनसंस्थेला जास्त फायदा होण्यासाठी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला डॉ. पवार यांनी दिला, यामुळे बहुधा काही लोकांचं पोट बिघडूही शकतं. डॉक्टर कुमार यांनी सल्ला दिल्याप्रमाणे सुरुवातीला जेवल्यावर ओव्याचा चहा प्यावा, आपलं पोट त्याला कशी प्रतिक्रिया देते हे ही पाहा.

किती प्रमाण असावं?- ओव्याच्या चहाचे सेवन करण्याचे ठराविक प्रमाण असे नाही पण डॉ कुमार यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ, उलट्या किंवा अतिसार सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल, तर ओव्याचा चहा घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वजन कमी करण्याचा एकमेव उपाय? – ओव्याचा चहा तुमच्या चयापचयाचा वेग वाढवतो परंतु वजन कमी करण्यासाठी हा जादुई उपाय नाही. वजनावर नियंत्रणासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.

डॉ. पवार सांगतात की, दिवसातून दोनदा २० – ३० मि.ली.ओव्याचा चहा पुरेसा ठरतो. डॉ. पवार आणि डॉ कुमार यांच्या सल्ल्यानुसार गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, पेप्टिक अल्सर, हायपर ॲसिडिटी किंवा ओव्याची ऍलर्जी असलेल्या लोकांनी हा चहा टाळावे.

हे ही वाचा<< नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

गोडपणा टाळण्यासाठी आपल्या चहामध्ये मध घालू शकता. साखरेचे जास्त सेवन टाळा, विशेषतः उन्हाळ्यात.

ओव्याचा चहा प्यायल्यावर तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष द्या. तुम्हाला कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास,सेवन थांबवा.