वाई : भारतातले सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही अडवू शकत नाहीत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी नावाच्या वज्रमूठ आघाडीला तडे गेले आहेत. शरद पवारांना अजित पवारांची काळजी वाटते आहे. सर्वजण आपले पक्ष कसे वाचतील याची चिंता करत आहेत. यामुळे देशातील राज्यातील निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या मोदी @९ जनसंपर्क अभियानात साताऱ्यातील सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे ,अतुल भोसले, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोदींनी भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे आणि त्यांची मानसिकता बदलण्याचा काम केल आहे गोरगरीब मध्यम वर्गीयांना ताकद दिली असल्याने २०२४ मध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी असणार आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा… “तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, म्हणून…”, ‘त्या’ टीकेवर शरद पवारांची खोचक टीका!

मोदींनी देशाच्या चौफेर विकास केला. कोविड काळात मोफत लसीकरण केले. सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले. परदेशामध्ये देशाला सन्मान मिळवून दिला. यामुळे मोदी विरोधक हतबल झाले आहेत. त्यांनी एकत्र येऊन मोदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असले तरी त्यांच्यात कोणतीही एकी नाही. सर्व पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही. महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे सरकार चौफेर विकासाचे काम करत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी नावाच्या वज्रमूठ आघाडीला तडे गेले आहेत. शरद पवारांना अजित पवारांची काळजी वाटते आहे. सर्वजण आपले पक्ष कसे वाचतील याची चिंता करत आहेत. यामुळे राज्यातील निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा… “उद्धवजी, तुमको मिरची लगी तो मै क्या करूँ”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले, “माझं जाहीर आव्हान आहे…!”

प्रवीण दरेकर म्हणाले, साताऱ्यातील दुष्काळ हटविण्यासाठी भाजपाने मोठा निधी दिला आहे. यामुळे माण खटाव भागात यापुढे दुष्काळ दिसणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी स्वतः घेतली आहे. साखर कारखानदारी अडचणीत असताना आयकर विभागापासून संरक्षण दिल्याने, इथेनॉल धोरण आणल्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. सर्व क्षेत्रात नरेंद्र मोदी त्यांच्या आणि राज्यातील सरकारने मोठी प्रगती केली आहे. भाजपाने हिंदुत्वाची कधीही भूमिका सोडलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांच्या नादाला लागून आपली भूमिका सोडलेली आहे औरंगजेब, लव्ह जिहाद आज डोके वर काढत आहे. सरकारने मुंबई महापालिकेतील चौकशी सुरू केल्याने उद्धव ठाकरे मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा आणि जावली मतदारसंघातील कामांसाठी पक्षाने मोठा निधी दिल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी साताऱ्याचा खासदार भाजपचा असेल असे सांगत जिल्ह्याच वातावरण भाजपमय झाल्याचे सांगितले.अतुल भोसले यांचे भाषण झाले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.