बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. अगदी पालिकेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बिचुकले यांनी अनेकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता ते राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी आपण चाचपणी करत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल, असं बिचुकले यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बिचुकले म्हणाले की, “काही जवळच्या आमदारांसोबत माझं बोलणं सुरू आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, तुम्ही सही कराल का? अशी विचारणा मी त्यांच्याकडे करत आहे. गेल्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मला राष्ट्रपती करा अशी मागणी केली होती. मी बहुजन समाजातील आहे. हुशार आहे. यामध्ये माझा काहीच स्वार्थ नाही. पण महाराष्ट्रातला एक पुरुष पहिल्यांदा राष्ट्रपती बनेल.”

हेही वाचा- राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार; १०० आमदार माझ्या संपर्कात, बिचुकले पुन्हा चर्चेत

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेशी युती करून जसे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्याप्रमाणे जर शक्य असेल तर महाराष्ट्रातील एक लढवय्या या नात्याने पवार साहेबांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर माझं काम एकदम सोपं होईल. २८८ आमदारांपैकी १०० सह्या मला सहज मिळून जातील,” असंही अभिजीत बिचुकले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss fem abhijeet bichukle ask support from ncp leader sharad pawar for presidential election rmm