बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरतो. नगरसेवक पदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारा अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निमित्त आहे ते आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं. १०० आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे बिचुकले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक आहेस का आणि तुझी पुढची भूमिका काय असणार आहे असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत अभिजीत म्हणाला, गेल्या पंचवार्षिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी मोदी साहेबांनी मी पत्र लिहिलं होतं की मला तुम्ही राष्ट्रपती करा. तरूण वयात राष्ट्रपती व्हायचय, पण मी आता वेगळा मार्ग निवडला होता. काही आमदारांशी बोलत होतो आणि ती बातमी मीडिया पर्यंत पोहोलचली की मी १०० आमदारांच्या सह्यांचा प्रयत्न माझा सुरु आहे. आता याला किती यश येतय ते येत्या दोन दिवसांमध्ये कळेल. जर १०० सह्या मिळाल्या तर आपला अर्ज तिथे दाखल होईल, असं बिचुकले म्हणाला.

Sharad pawar take a Dig on Pm Modi
“ती मोदींची स्टाईल…”, शरद पवारांकडून पंतप्रधानांची नक्कल; म्हणाले, “जाईल तिथं ते…”
Narendra modi Uddhav Thackeray sharad pawar
“…म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले”, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पंतप्रधान मोदींकडून विश्लेषण
bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम

दरम्यान, या आधी बिचुकले ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शोमध्ये एका खेळा दरम्यान, अभिजीतसमोर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो ठेवण्यात आला. तर ट्रम्प यांचा फोटो पाहताच बिचुकले म्हणाला, ‘हे तर आमचे तात्या.. आमच्या गावाकडचे. अत्यंत हुशार आणि चांगला माणूस.’ या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला होता.