राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आणि सरकारमधील मंत्र्यांवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने टीका केली जात आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वाईन उद्योगातील लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर अजित पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्याही भूमिकांवर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात करोनासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मला या कुठल्याच गोष्टीत रस नाही”

आपल्याला या आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. “पुरावे देऊन हे आरोप सिद्ध झाले तर त्याबद्दलची कारवाई होईल. पण हल्ली मी बघतो की खूप काही आरोप केले जातात. ते कुठल्या स्तरावर जातायत, कशी माफी मागितली जाते, दिलगिरी व्यक्त केली जाते हे तुम्ही पाहाता. मी नेहमी सांगतो की मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. मला कामात रस आहे. आम्ही आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्याचं काम करतोय”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते”, प्रविण राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा!

“महत्त्वाच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. राज्यकर्त्यांनी त्याविषयी योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. विरोधकांनीही कुठल्याही गोष्टीला नको तितकं महत्त्व देऊन त्याची चर्चा करू नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर

दरम्यान, किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत केलेल्या आरोपांविषयी अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोविड सेंटर्सच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासून पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही चूक होणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. जर कुणाचं तसं म्हणणं असेल त्यांच्याविरुद्ध पुरावे द्या, त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar warns govt and bjp on politics focus on real issues pmw