अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांच्या गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. तसेच घड्याळ या पक्षचिन्हावरही दावा केला आहे. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं असून याप्रकरणी आज (६ ऑक्टोबर) सुनावणी झाली. या सुनावणीवेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते. दोन तास ही सुनावणी चालली. या सुनावणीवेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी आयोगासमोर अजित पवार गटाची बाजू मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनिंदर सिंह यांनी यावेळी जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवादावर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, मीच बेकायदेशीर असेन, तर माझी सही असलेला एबी फॉर्म भरून निवडून आलेले राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार बेकायदेशीर ठरतील.

जयंत पाटील म्हणाले, माझी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझ्याच सहीने राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. मीच जर बेकायदेशीर असेन तर मग महाराष्ट्रातील सगळ्या (राष्ट्रवादी काँग्रेसच्या) निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा डाव यात दिसतोय. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मी निवडणूक लढून निवडून आलोय. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली. माझ्याकडे प्रफुल पटेलांचंच पत्र आहे.

हे ही वाचा >> Nobel Peace Prize : १३ वेळा अटक, चाबकाचे १५४ फटके अन् ३१ वर्ष तुरुंगवास, नर्गिस मोहम्मदींना यंदाचं शांततेचं नोबेल

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज झालेल्या सुनावणीवर थोडक्या शब्दांत भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले, ही सगळी माणसं (अजित पवार गट) शरद पवारांच्या कार्यशैलीतून मोठी झाली आहेत. ही माणसं आता थेट शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत. घरातला लहान मुलगा मोठा होतो. मग त्याला स्वतंत्र व्हायचं असतं, म्हणून तो स्वतःचं वेगळं घर बांधतो. परंतु, घर बांधल्यावर तो त्याच्या वडिलांना घराबाहेर काढत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil says if i am illegal then all mlas elected on my signature of ab form will be illegal asc