कोल्हापूर : राज्याच्या कारागृह कारागृह घोटाळा प्रकरणी चौकशीबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
शेट्टी म्हणाले, की राज्यातील कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांनी हे प्रकरण वरिष्ठ पातळींवर असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सांगितले.
राज्याच्या प्रशासनात मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याची चौकशीबाबत टाळाटाळ होत आहे. कारागृहामधील खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप शेट्टी यांनी या वेळी केला.