Marathi News Today : राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल लागल्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यावर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे. परंतु मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी अद्याप घेऊ शकले नाहीत. आज (१५ मे) दिवसभरात याविषयीच्या बातम्या पाहायला मिळतील.
Maharashtra Breaking News Live Update Today : राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.तसंच, हा दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर बातमी वाचा
पुणे: पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत सोमवारी (१५ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन बेरोगार तरुणाची १२ लाखांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
नागपूर: वसतीगृहासमोर असलेल्या चहाटपरीवर चहा घेण्यासाठी येणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चहाटपरी चालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायला पाहिजे होते, असे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांबाबत सर्वसाधारण मत व्यक्त होत आहे. पण या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे आणि त्यानुसार राजीनामा न देता काही वेगळी रणनीती वापरणे तेव्हा शक्य होतं का? असाही विचार केला पाहिजे.
नागपूर : फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव. फुफ्फुसाद्वारे, नाकावाटे आत घेतलेला हवेतील प्राणवायू फुफ्फुस परत नाकावाटे बाहेर सोडते. जीवंत राहण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरते. त्याचप्रमाणे एखादे शहर पर्यावरणीयदृष्ट्या जीवंत ठेवण्यासाठी तेथील वृक्ष फुफ्फुसाचे काम करतात. नागपूरमधील कारागृह परिसरातील घनदाट वृक्ष हे सध्यातरी शहराचे फुफ्फुसच आहेत. मात्र त्यावर यापूर्वी मेट्रोसाठी घाव घालण्यात आला. शेकडो झाडे तोडण्यात आली आणि आता इंटरमॉडेल स्टेशनसाठी जागा घेऊन दुसरा घाव घालण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
नागपूर : ‘मोखा’ या चक्रीवादळाची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असली तरी विदर्भाला मात्र त्याचा धोका नाही. सूर्यनारायण मात्र विदर्भावर कोपला असून तापमानाने सरासरी ओलांडली.
नागपूर : मेट्रो उभारणीसाठी महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी-विक्रीवर लावण्यात येणारा एक टक्का अधिभार मेट्रो टप्पा-२ साठी ग्रामीण भागातही आकारण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती कायदा १९१६१ मध्ये दुरुस्ती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
नागपूर : २०२१-२२ या वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण महाराष्ट्रात प्राथमिक शाळांमध्ये ०.८ टक्के तर उच्च माध्यमिक शाळांमध्ये २.९ टक्के नोंदवण्यात आले आहे. मध्यप्रदेश, छत्तीगडसह देशातील काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हे प्रमाण कमी आहे.
जळगाव – राज्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला असून, जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत होता. राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा वेग वाढू लागल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी रविवारी जळगावचे किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.
अमरावती : यंदा पुरेसा पाऊस होऊनही अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात सध्या ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नागपूर : विवाहित असलेल्या ३० वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. चैत्रराम सेलोकर (३४, बेला. जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
नाशिक – इगतपुरी तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात काही वेळा स्फोटकांचा वापर केला जात असून स्फोटकांमुळे रस्त्यालगत असलेल्या घरांना तडे जात आहेत. याविषयी कंपनी अधिकारी, प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणीच मदत करत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याच्या कामावर एका २५ वर्षीय कामगाराचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१४ मे ) सकाळी ९.३० च्या सुमारास नागभीड तालुक्यातील आलेवाही (खरकाडा) येथे घडली. राहुल दिवाकर चिमलवार रा. जिवनापूर असे मृत कामगाराचे नाव आहे.
पुणे: खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत.
कर्नाटक विधानसभेच्या निकालावर बोलताना आमदार रोहित पवारांनी राज्याच्या भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, “मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी” अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यावरून रोहित पवारांनी टोला लगावला आहे. “अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार केला. तरीही भाजपा हरते. हा एक मोठा संदेश आहे. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाळणा कुठे, बारसं कुठे? असं बोलण्यात अर्थ नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. त्यामुळे उगाच शब्दांत खेळू नका. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. संतांच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्धी चांगली झाली आहे. योग्य निर्णय ते देतील. उगाच गंडवण्याचा प्रयत्न करू नका”, असंही रोहित पवार म्हणाले.
नागपूर: सातव्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीला पाण्याच्या टाकीवर नेऊन बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली.
तामिळनाडूच्या विल्लुपरम आणि चेंगलपट्टू या दोन जिल्ह्यांत विषारी दारू प्यायल्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तर, ३३ हून अधिक लोकांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. या दोन जिल्ह्यांत एकाचवेळी १० जणांचा मृत्यू झाले असल्याने पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. सविस्तर वृत्त वाचा
कर्नाटकात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळून राज्यात सत्तेच्या खुर्चीत बसण्याचा बहुमान मिळवला आहे. या निकालामुळे भाजपाची चांगलीच पीछेहाट झाली असून आगामी काळात उत्तर प्रदेश आणि गुजरात वगळता भाजपाचे इतर राज्यातून उच्चाटन होईल, असं ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसंच, मोदींनी अपयशाचे खापर भाजपाचे राष्ट्रीय नेत्यावर फोडले असल्याचाही आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त वाचा
“हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका”, असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम ५०५ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी आता महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी आज ट्वीट करून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सविस्तर वृत्त वाचा
शंभूराज देसाई म्हणाले, मे २०२२ पर्यंत आम्ही सर्वजण म्हणजेच ५६ आमादार उद्धवजींबरोबर होतो. संख्याबळ त्यांच्याबरोबर होतं. विधानसभेतल्या आमदारांची संख्या त्यांच्याबरोबर होती. संख्याबळ असल्यामुळे आमदारांचं ज्यांना महाविकास आघाडी करायची होती ते चर्चा करायला मातोश्रीवर यायचे. आता त्यांच्याकडे संख्याबळ राहिलेलं नाही. लोकशाहीत या गोष्टीला महत्त्व आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या खुर्चीत सामान्य नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांना बसावं लागतंय. महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉमन कोच शेअर करावा लातोय. उद्धवजींच्या बाबतीत घडत असलेली ही गोष्ट गोष्ट खटकली.
महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून…, कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाने भाजपाची कुवतच काढली
ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने कर्नाटक भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या आजच्या (१५ मे) अग्रलेखात म्हटलं आहे की, “कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. कर्नाटकात भाजपने विजय मिळवला असता तर त्याचे श्रेय मोदी यांनीच घेतले असते, पण पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे नड्डा यांचे डोके आहे”, अशी खोचक टीकाही करण्यात आली आहे.