Maharashtra Politics News Updates, 31 July 2025 : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय आज निकाल दिली आहे. यामध्ये देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या या खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची सुटका होणार की त्यांना शिक्षा होणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.. याबरोबरच एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी झालेल्या अटक प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता असून यासंबंधी घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
जिल्हा परिषद शाळा सीसीटीव्हीचे काम जलदगतीने करा – राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रशासनाला सूचना
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता सुरक्षिततेची दृष्टीने महत्वाची पावले उचलली जाणार आहेत. ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज निकाल आलेला आहे, हा पूर्ण निकाल मला वाचता आलेला नाही पण प्राथमिक दृष्ट्या जे वाचलं त्यावरून सरकारी पक्षाला आरोपींवर संशयाच्या आधारावर दोषी सिद्ध करता आलेला नाही, अस कोर्टाने म्हटलेले आहे. आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा न्यायालयाने दिलेला आहे. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न येणे चिंताजनक आहे. मालेगाव स्फोट झाला त्यात ज्यांचा मृत्यू झाला, जे जखमी झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि या प्रकरणातील जे सूत्रधार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अमर शहीद हेमंत करकरे यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. या स्फोटातील पीडितांना सरकारकडून न्यायची अपेक्षा आहे.
या स्फोटातील पीडितांना सरकारकडून न्यायची अपेक्षा आहे. पीडितांना न्याय मिळावा यासाठी सरकारने न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करावे..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज निकाल आलेला आहे, हा पूर्ण निकाल मला वाचता आलेला नाही
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 31, 2025
पण प्राथमिक दृष्ट्या जे वाचलं त्यावरून सरकारी पक्षाला आरोपींवर संशयाच्या आधारावर दोषी सिद्ध करता आलेला नाही, अस कोर्टाने म्हटलेले आहे.
आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा न्यायालयाने दिलेला आहे.… pic.twitter.com/EX5kkYrS2R
बॉम्बस्फोट खटला निकालानंतर मालेगावात…
मालेगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अतिरिक्त कुमक पोलिसांकडून मागविण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मालेगावच्या भिकू चौकात विशेष खबरदारी घेण्यात आली असून दोन दिवसापासून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील घेण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्ततेनंतर प्रसाद पुरोहित यांची प्रतिक्रिया म्हणाले, “या देशाने मला…”
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांपैकी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रतिक्रिया दिली आहे “या देशाने मला सेवा करण्याची संधी यापूर्वीही दिली, जामिनावर सुटल्यावरही दिला आणि यानंतरही मला संधी देत आहे याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. एक निर्दोष ठरल्यावर माझी इच्छा आहे की परमेश्वर आणि मातृभूमीने ही संधी प्रत्येकाला द्यावी आणि ते देत असतात.पण कमतरता आपल्यात असते की आपण त्याचा फायदा घेत नाहीत. त्यामेळे देशाचे काम कार, देश सोडून दुसरं काही नाही, अशा प्रतिक्रया निवृत्त कर्नल पुरोहित यांनी दिली,” असे ते म्हणाले.
Mumbai, Maharashtra: In the 2008 Malegaon Bomb Blast case, the NIA court has acquitted all seven accused
— IANS (@ians_india) July 31, 2025
One of the acquitted, Lt. Colonel Purohit, says, "This nation gave me the opportunity to serve even earlier. Even after being released on bail, I was given that chance. I am… pic.twitter.com/0W83XuIKBX
“मालेगाव येथे जी घटना घटली थी अप्रिय होती, सर्वांनीच त्याचा निषेध केला. जेव्हा न्यायपालिकेचा निर्णय येतो तो सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. अखेर आपण आपल्या संविधानाअंतर्गत न्यायपालिकेला महत्त्व देतो. आपले संविधान हेही सांगते की आपण कोणालाही धर्म आणि जातीच्या आधारावर ओळखत नाही आपण त्यांन फक्त भारतीय म्हणून ओळखतो. त्यामुळे आज जो निर्णय आला आहे तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
VIDEO | 2008 Malegaon Blast Case verdict: “All condemned what happened in Malegaon, but the court's verdict in the Malegaon blast should be welcomed by all. We consider citizens of our country as ‘Bharatiya’… Hindus were killed in the Pahalgam attack. We will only call this a… pic.twitter.com/jxoUAKyHfe
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2025
विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात निर्दोष सुटलेले आहेत तरी कोण?
“मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे,” अशी पोस्ट भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
?मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 31, 2025
सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं…
धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध नाही… मालेगाव निकालावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्पष्टच बोलले
Malegaon Bomb Blast Case Verdict Updates :फक्त २००८ नाही तर २००६ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही…
Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया.., म्हणाले, काँग्रेस सरकारने मुद्दामून धार्मिक…
Malegaon Bomb Blast Case Verdict Updates: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर संघभूमी तून पहिली प्रतिक्रिया, “हिंदू दहशतवाद हा…”
Malegaon Bomb Blast Case Verdict Updates : ‘हा अन्याय’… निकाल ऐकून दुःख झाले… मालेगावमधील पीडितांच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया
“उशीरा का होईना, न्याय मिळाला,” मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
न्यायालयाच्या निकालाचं स्वागत सगळ्यांनी केलं आहे. पण न्याय मिळायला उशीर झालाय. देर आए, दुरुस्त आए. उशीरा का होईना, न्याय मिळाला आहे. तेव्हा देशात यूपीएचं सरकार होतं. देशात मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा यूपीए सरकारचं म्हणणं होतं की दहशतवादाला कुठलाही रंग नसतो. पण मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यावर सरकारने म्हटलं की हा भगवा दहशतवाद आहे. त्यात राजकारणाचा प्रयत्न केला. पण या प्रकरणाच्या राजकीयिकरणाला न्यायालयाने आजच्या निकालातून चपराक दिली आहे. भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्वाला या बॉम्बस्फोटाशी जोडलं गेलं.
जे घडलं ते दुर्दैवी आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादाचं समर्थन करत नाही, करणारही नाही. न्यायव्यवस्थेवर आमता विश्वास आहे. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिली आहे.
सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचे वीज आंदोलन; सत्यनारायण महापूजा व महाआरती करून देवाला साकडे घालणार
मालेगाव स्फोटामुळेच ‘भगवा दहशतवाद’ शब्द रुढ!
“आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!”, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
“आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!”, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
…म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खटला चालला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएचा दावा काय आणि आरोपींचा युक्तिवाद काय ?
७/११ नंतर आता मालेगावमधील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; एटीएसच्या तपासाला दुसरा मोठा धक्का
एटीएसच्या तपासावर एनआयएने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि…
बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे?; काँग्रेसचा सरकारला सवाल
बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील, ते पकडले गेले पाहिजेत. यासंदर्भात सरकार काय करणार? हादेखील प्रश्न आहेच. शहीद हेमंत करकरे यांनी या प्रकरणात जे काही धागेदोरे शोधले होते, त्यांचं काय झालं? या सरकारची ही जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटला:साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींवर आरोप काय होते ?
निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देणार – पीडित कुटुंबाचे वकील
बॉम्बस्फोट झाल्याचे न्यायालयाने सिद्ध केले आहे. आम्ही या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात अव्हान देऊ. आम्ही तात्काळ याचिका दाखल करू, असे पीडितांच्या कुटुंबाचे वकील शाहिद नदीम म्हणाले.
The bomb blast has been proved by the Court. We will challenge this acquittal in the High Court. We will file the appeal independently: Victim families' lawyer Advocate Shahid Nadeem https://t.co/GNyiAclNoF
— ANI (@ANI) July 31, 2025
‘दहशतवादाला कोणताही धर्म नसतो पण…’; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष मुक्तता
दहशतवादाला कोणताही धर्म नसतो पण नैतिकतेच्या आधारावर शिक्षा दिली जाऊ शकत नाही. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी भाजपा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व सातही आरोपींनी एएनआय न्यायालय निर्दोष मुक्त करते.
२९ सप्टेंबर २००९ रोजी नाशिकमधील मालेगाव येथे झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते.
#Breaking Terrosim has no religion but conviction cannot be based on moral grounds, NIA Court acquitts all seven accused including former BJP MP Pragya Singh Thakur in the 2008 Malegaon blast case.
— Bar and Bench (@barandbench) July 31, 2025
An explosion that occured on September 29, 2009 at Malegaon, Nashik had killed… pic.twitter.com/l3ECjP5JTC
पुरावे न आढळल्याने एनआयएच्या विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधून सर्व सातही जणांची निर्दोष सुटका केली आहे. पुराव्यांच्या आभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणले हे सिद्ध होऊ शकलेले – न्यायालय
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल वाचनास कोर्टात सुरूवात झाली आहे. यामध्ये बॉम्बस्फोट झाला , मात्र मोटोरसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही …. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध नाही. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मोटाईसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा आरोप, पण ही मोटारसायकल त्यांच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित NIA न्यायालयात दाखल; पाहा Video
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित एनआयए न्यायालयात दाखल झाले आहेत. १७ वर्षे जुन्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालय आज निकाल देणार आहे.
VIDEO | Mumbai, Maharashtra: 2008 Malegaon bomb blast case accused Lt. Colonel Prasad Purohit arrives at NIA court. The special NIA court is likely to pronounce verdict in the 17-year-old blast case today.
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/zgrI11vckK
“१७ वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो, मला स्वतंत्र्य भारताच्या स्वायत्त, सार्वभौम विश्वसनिय न्यायायालयावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या निर्दोषत्वावर न्यायालय ठप्पा लावेल. जे सत्य आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं, तात्कालिन युपीए सरकारला माहिती होतं, तपास यंत्रणांना माहिती होतं, ते सत्य आज जगाला माहिती होईल,” अशी प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.