Maharashtra News Highlights: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण कडू यांनी स्वीकारले आहे. मात्र याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरू राहणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज मेळावा घेतला जाणार आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाबाबत प्रझेंटेशन दिले जाण्याची शक्यता आहे.
तर मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. आजही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
मुंबईत १७ लहान मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू, नेमकं काय घडलं?
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या वतीने अद्याप यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
wepan crime : बंदुकीचा धाक दाखवूत पंपावर दरोडेखोरांचा थरार : व्हिडीओ
“बच्चूभाऊ आपण मुंबईत बैठकीला गेला आहात तर नक्कीच या बैठकीतून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करूयात. पण हे गोलगोल बोलून शब्दांत गुंडाळणारं बेभरवशी सरकार आहे, हेही लक्षात राहू द्या. कारण सरकारने शब्द देऊनही आपण मुंबईत आलात आणि सरकारने काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. या कृतीवरून सरकारने शेतकरी आंदोलनापासून जनसुरक्षा कायद्याची ट्रायल घ्यायला सुरवात केली की काय, असं दिसतंय. तसं असेल तर याविरोधातही लढू, पण आज शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपल्यासोबत आहे.. आणि नेहमीच राहील.. आज जर न्याय मिळाला नाही तर पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथंच आंदोलनाला पुन्हा सुरवात करू… शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जुलमी सरकारविरोधात ताकदीने लढू आणि जिंकू..!” रोहित पवारांनी अशी पोस्ट केली आहे. याबरोबर त्यांनी बच्चू कडूंना लिहिलेलं पत्र देखील जोडले आहे.
मा. बच्चूभाऊ आपण मुंबईत बैठकीला गेला आहात तर नक्कीच या बैठकीतून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करूयात. पण हे गोलगोल बोलून शब्दांत गुंडाळणारं बेभरवशी सरकार आहे, हेही लक्षात राहू द्या. कारण सरकारने शब्द देऊनही आपण मुंबईत आलात आणि सरकारने काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांना… pic.twitter.com/it9peaqBVk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 30, 2025
Thane Water Cut : ठाण्याच्या ‘या’ भागात शनिवारी पाणी नाही; जलवाहीनी दुरुस्ती कामामुळे बंद राहणार पाणी पुरवठा
Wagle Estate Fire: वागळे इस्टेटमध्ये आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना पाय घसरले… तीन प्रवासी सुदैवाने बचावले; जागरूक प्रवाशांच्या सतर्कतेमुळे जीवदान
शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेसाठी बच्चू कडू आणि इतर नेते मुंबईत दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता यांच्यात चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागण्या मान्य होतील का? असा प्रश्न कडू यांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, “आम्ही सकारात्मक आहोत. नकारात्मक बोलण्यात काही अर्थ नाही. शेतकर्यांच्या एकंदरीत भावना मुख्यमंत्री समजून घेतील, त्यांच्या भावनेचा आदर करतील. आंदोलन जरी आम्ही केलं असलं तरी ते प्रत्यक्षात शेतकरी, मजूर, मेंढपाळ आणि दिव्यांगाचं होतं. आम्ही नाममात्र आहोत. हे आंदोलन श्रेयाची लढाई नाही, राजकारण नाही, तर वेदनांची लढाई आहे हे मुख्यमंत्री समजून घेतील असे आम्हाला वाटते.”
लाचलुचपत विभागाचा जनजागृती सप्ताह; जास्तीत जास्त लोकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीवर भर दिला जातोय…
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : न्यायालयाने कठोर इशारा देताच बच्चू कडू यांच्याकडून ‘रेल रोको आंदोलन’ मागे घेण्याचा निर्णय…
Voter List Fraud : मतदारांचा पत्ता आयुक्तांचे निवास स्थान, नवी मुंबई आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
Nagpur Farmers Protest : मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी बच्चू कडू मुंबईकडे रवाना
व्हायरल रीलची कमाल! कर्नाटकातील बेपत्ता तरुणाची एका व्हायरल ‘Reel’ मुळे घरवापसी; कुटुंबाला २ वर्षांनी सापडला मनोरुग्ण मुलगा
Vasai Virar Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात ७८ हेक्टर शेतीची पाहणी पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनी व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांच्या समोर होत होती. यातील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्ताकडून देण्यात आले आहेत.
Blood Donation : नवी मुंबईत रक्त तुटवडा; रक्तदान करण्यासाठी आवाहन
Thane Ring Metro : ठाणे अंतर्गत मेट्रोचे बांधकाम सुरू होणार नोव्हेंबर महिन्यात ? २०२९ पर्यंत प्रवासी सेवेत
ठाणे जिल्ह्यातील जि. प. आरोग्यवर्धिनी केंद्रातील योग शिक्षक मानधनापासून वंचित
Gold-Silver Price : काय सांगता ? सोने-चांदी आणखी स्वस्त… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक
मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडी (MVA) ची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित आहेत.
#WATCH | Mumbai: Maha Vikas Aghadi (MVA) meeting underway at YB Chawhan Centre in Mumbai.
— ANI (@ANI) October 30, 2025
Shiv Sena chief Uddhav Thackeray, Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray and other leaders of the MVA were present in the meeting. pic.twitter.com/Kd2iwm8eup
Unseasonal Rainfall : धुळे जिल्ह्यातील कापूस, मका, बाजरी, ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान
VVPAT EVM Controversy : ‘स्थानिक’ निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार? कायदा काय सांगतो?; निवडणूक आयोग म्हणते, ‘अभ्यास…’
Police Recruitment: भरपूर झाला सराव, आता पोलीस भरतीसाठी तय्यार; नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० जागांवर भरती
गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यात एकच बंधन, नेमके काय ?
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, रब्बी पेरण्यांचाही खोळंबा; वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्याने मातीमोल
दिवाळी संपली मात्र बोईसरच्या पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम
MPSC Result : ‘एमपीएससी’च्या वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, नोव्हेंबर महिन्यात होणार मुलाखती
Video: वाहतूक पोलिसच जाळ्यात अडकले, तरुणाने व्हिडिओ काढत पोलिसांचे चलान फाडले…
Nagpur Farmers Protest : चिमुकल्याचे जोशपूर्ण भाषण, म्हणाला “फडणवीस पहिली गोळी माझ्यावर….”
अधिकारी बदलताच टिटवाळा, मोहने, आंबिवलीत बेकायदा बांधकामांना उधाण
Election Commission: नवी मुंबईत मतदारांचा पत्ता आयुक्तांचे निवास स्थान…!
