Maharashtra Politics Updates नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात पोलिसांना एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या आणि अशा घटनांवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra News Live Update : नगरविकास खातं म्हणजे पैसे खाण्याचं कुरण, संजय राऊत यांची टीका; यासह महत्त्वाच्या बातम्या

12:25 (IST) 18 Sep 2025

शिळफाटा, घोडबंदर रस्त्यावरील १८ तास अवजड माल वाहतूक बंदीने वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी

ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घोडबंदर, शिळफाटा, काटई बदलापूर रस्ते महामार्गावरील माल वाहतूक करणारी अवजड वाहतूक १८ तास बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने काढल्याने माल वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे …अधिक वाचा
12:15 (IST) 18 Sep 2025

सिडकोचे स्वस्त घर शिंदेकृपेच्या प्रतीक्षेत, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे ग्राहकांचे लक्ष

सिडकोची घरे महाग असल्याची ओरड सर्वत्र सुरू असताना या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तोडगा काढला जाईल अशी सारवासारव प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीं केली होती …अधिक वाचा
11:29 (IST) 18 Sep 2025

पुण्याच्या विकासाच्या नव्या वाटा! आयटी सोडून इतर क्षेत्रांच्या दिशेने वेगाने वाटचाल

पुण्याचा आर्थिक विकास गेल्या काही वर्षांत आयटीकेंद्रित असताना त्यात आता जागतिक सुविधा केंद्रांची (जीसीसी) भर पडू लागली आहे. यातून पुण्याच्या विकासाच्या नवनवीन वाटा समोर येऊ लागल्या आहेत. …वाचा सविस्तर
11:14 (IST) 18 Sep 2025

विमानतळामुळे विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपुलाचाही भाग्योदय, ठाणे-विमानतळ उन्नत मार्गाला जोडरस्त्याची आखणी

राज्य सरकारकडून आखण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांपैकी विक्रोळी ते कोपरखैरणे या ठाणे खाडीवरील आणखी एका नव्या पुलाच्या कामालाही लवकरच मुहूर्त मिळेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. …वाचा सविस्तर
11:14 (IST) 18 Sep 2025

“महाराष्ट्र २० वर्षात मजुरांचा प्रदेश होणार, बिहारनंतर दुसरा”, शेतकरी नेता असे का म्हणाला?

शेतकरी नेते रोखठोक व सरकारी धोरणविरोधात भाष्य करण्यात अग्रेसर असतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलन चांगलेच गाजले होते. त्याचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकेत यांनी केले होते. …वाचा सविस्तर
10:54 (IST) 18 Sep 2025

७५ व्या वर्षी मी थांबलो नव्हतो, मोदींना थांबा म्हणू शकत नाही-शऱद पवार

नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाही. माझ्या ७५ व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही, असं विधानही शरद पवारांनी केलं. पंचाहत्तरीनंतर थांबू असे बोललोच नव्हतो अस काही लोक म्हणतायत, असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या यू-टर्नवर देखील मिश्कील प्रतिक्रिया दिली. 

10:50 (IST) 18 Sep 2025

डोळ्यांची जळजळ, सूज, सतत डोकेदुखी असल्यास तपासणी करूनच घ्या; संपूर्ण मुंबईत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन…

महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत नुकत्याच ‘नमो नेत्र संजीवनी अभियानाची अंमलबजावणी सुरू केली असून मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन उपनगरीय रुग्णालय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत करण्यात आले आहे. …अधिक वाचा

शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. (PC : RNO)

नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.