Maharashtra News Highlights: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि त्यांच्या जोडीला यंदा राज ठाकरे आल्याचे दिसते. राज्यातील प्रमुख शहरात ९६ लाख बोगस मतदार निर्माण केल्याचा राज ठाकरे यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) केला. जोवर मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, अशा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
१ नोव्हेंबर रोजी विरोधकांनी या मुद्द्यावर मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. तर सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे) पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या मनोमिलन आणि विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे.
दुसरीकडे पुण्यातील जैन मंदिराच्या जमीन व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टिकास्र सोडले आहे.
Maharashtra Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
मोठ्या शहरात शेतमाल वितरणाचा ‘सांगली पॅटर्न’; रेल्वेने पेरू, टोमॅटो, अंडी दिल्लीला रवाना
छत्रपती संभाजीनगर : आईच्या स्मरणार्थ तीन हजारांवर रुग्णांना मदतीचा हात
शनिवारवाडा: मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात रुपाली पाटील ठोंबरे यांचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी
भाताच्या कणसाच्या आकर्षक तोरणांना मोठी मागणी; ग्रामीण भागातील हंगामी रोजगाराला चालना
Traffic Jam Nallasopara:सणासुदीला नालासोपाऱ्यात वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल
Maharashtra News Live Update: मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात आंदोलन करत असताना रुपाली ठोंबरे पाटील अचानक कोसळल्या
पुणे शहरातील शनिवारवाड्यात दोन दिवसापूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठण केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन केले. मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासह त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना समज द्यावी असेही सुचवले. दरम्यान आंदोलन करत असताना रुपाली ठोंबरे पाटील अचानक चक्कर आल्यामुळे जमिनीवर कोसळल्या. मात्र इतर कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना वेळीच मदत दिली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह सुरेश भटेवरा यांचा राजीनामा कशामुळे?… प्रतिष्ठानमध्ये एकाधिकारशाही आल्याचा सूर
MPSC : एमपीएससीच्या सचिवपदी जगन्नाथ वीरकर; सचिवांचे वेतन किती असते, माहिती आहे का?
वडापाव खाणे पडले महागात; एकाच वेळी दोन मोबाईल चोरी
“अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे आमदार भाजपात प्रवेश करणार”- रोहित पवारांचा दावा; कर्जमाफीबाबत सरकारला…
यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी…
सत्य मांडणाऱ्यांवर अर्बन नक्षलवादाचा ठप्पा; ॲड. असीम सरोदे म्हणतात,‘सत्ताधाऱ्यांकडून…’
जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
प्लास्टिक झेंडूच्या ढिगांमध्ये खरे फुले कोमेजले; किरकोळ बाजारात अवघा २५ ते ३० रुपये किलोचा दर
Dahisar Toll Plaza: दहिसर टोलनाका स्थलांतरासाठी ‘नवी तारीख’
रायगड, वाडगाव येथे दहा एकरवर साकारतेय माझे वन
Pimpri Chinchwad Crime : चिखलीत तरुणावर चाकूने वार
Maharashtra News Live Update: “आमदारांच्या जिवाला धोका निर्माण करण्यासाठी…”, शिंदे गटाच्या नेत्याची बच्चू कडूंवर टीका
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या परिषदेत बोलत असताना शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर राहण्यास सांगितले. हे सांगत असताना ते म्हणाले, स्वतःचा जीव संपविण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा. या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई म्हणाले, बच्चू कडू यांनी केलेले विधान धक्कादायक आहे. ते एकेकाळी आमचे सहकारी होते. ते लोकांना हिंसेसाठी प्रोत्साहित करत आहेत. आमदारांना कापा, असे सांगून ते धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Medha Kulkarni : शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीत जुंपली, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
परभणीत काँग्रेस-राष्ट्रवादीची काळी दिवाळी; काँग्रेसचे पिठलं भाकर आंदोलन तर राष्ट्रवादीचे मौन
दिवाळीत उटण्याऐवजी आंदोलन; कामोठेकरांचा कोरड्या नळांवर संताप; सिडकोवर खोट्या आश्वासनाचा आरोप
Diwali 2025: लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूंच्या फुलांनी सजल्या बाजारपेठा, कमळाच्या फुलांना मोठी मागणी
Video : आता गाणे गाऊन- एकूण रुग्णांवर उपचार… नागपुरातील या रुग्णालयाची भन्नाट कल्पना…
शनिवार वाड्यात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. शनिवार वाडा ही वास्तू भाजपाला तीर्थस्थान, देवस्थान वाटते काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याच शनिवारवाड्यात मस्तानीचा बराच काळ वावर राहिला आहे. पेशव्यांनी शनिवार वाड्यात छत्रपतींचा भगवा उतरवून युनियन जॅक फडकवला होता, असेही ते म्हणाले.
मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपावाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना तीर्थस्थान वाटते का?…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 20, 2025
तुम्हाला तीथे जप करत बसायला कोणी अडवले आहे? pic.twitter.com/f8e0PqNqsK
‘छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नाही तर सासऱ्यांनी मारले’, बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान
आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका; बच्चू कडू यांचे खळबळजनक वक्तव्य
लक्ष्मीपूजन सोमवारी करावे की मंगळवारी ?….नाशिक येथील पुरोहित संघाच्या मते हाच दिवस योग्य
भाजपच्या शैक्षणिक मनुवादामुळे एका युवकाचे करिअर उध्वस्त; वडेट्टीवारांची एक्स वर पोस्ट
पनवेलमध्ये दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शन
‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार – वानवडी पाेलिसांकडून सहा जण गजाआड
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनीच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ आमनेसामने आले आहेत. (PC : Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol/FB)