Maharashtra Live News Updates, 22 October 2025: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय चक्र फिरू लागली आहेत. आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकांआधीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं राज्यात पाहायला मिळत आहे.
Maharashtra Marathi News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर…
पिंपरीत सोळा तासांत १७ आगीच्या घटना; ६० विद्युत दुचाकी जळून खाक
पिंपरीत चॉइसच्या वाहन क्रमांकाचे आकर्षण; आरटीओच्या तिजोरीत कोटींचा महसूल
मूकबधीर बालकाच्या आयुष्यात ‘ध्वनी’ची पहाट, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ऐतिहासिक क्षण…
Video : अंबानींचे रिलायन्स आगीच्या भक्ष्यस्थानी
नवनीत राणांचे बच्चू कडूंना खुले आव्हान; म्हणाल्या, “तुमची संपत्ती मला द्या…!”
नागपुरात दिवाळीतअग्नीतांडव! फटाक्यांमुळे सहा ठिकाणी आगी,रिलायन्स स्मार्ट स्टोर भस्मसात
Bachchu Kadu Mocks Ravi Rana Navneet Rana – “हे नवरा-बायको एका पक्षात राहू शकत नाहीत”
दिवाळीच्या दिवशीही बच्चू कडूची आठवण काढली जाते म्हणजे त्यांना किती जिव्हाळा आहे हे मानलं पाहिजे. पक्षांकडे तिकिटं मागायची हे त्यांचे धंदे आहेत. मी मरेपर्यंत कुणाच्या ओंजळीनं पाणी पिणार नाही. कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवणार नाही. ती तुझी लायकी आहे. देवाभाऊनं कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले. तुम्ही स्वत:चं पाहा. तुम्ही नवरा-बायको एका पक्षात राहू शकत नाही. ज्यांनी भाजपाला, मोदींना शिव्या दिल्या, त्या आता भाजपाच्या नेत्या झाल्यात. भाजपाच्या या लाचारीचं संशोधन झालं पाहिजे – बच्चू कडू, प्रहार संघटनेचे अध्यक्ष
Maharashtra Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकारणाची बित्तंबातमी!
