Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. मराठा आरक्षणापासून ते राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्यापर्यंत अनेक घडामोडींची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आज दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात होणाऱ्या पाच मेळाव्यांकडे आणि प्रमुख नेत्यांच्या भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचे मेळावे असतील.
यात नेमक्या काय भूमिका मांडल्या जाणार? यावर पुढील काही दिवसांमधील राज्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.
Dasara Melava 2025 Maharashtra महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे, प्रमुख नेत्यांच्या भूमिकांकडे लक्ष!
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
समाज पुढाकार घेत आहे म्हणून सरकारच्या आधी आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी ठरत आहे. संघाचे स्वयंसेवक व इतर संस्थांनाही याचा अनुभव येत आहे. बुद्धिवादी लोकांमध्येही भारताचं असं स्वतंत्र मॉडेल तयार करता येईल का याविषयी विचार होऊ लागला आहे.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
सुदैवाने भारतात आशेचा किरण दिसतोय की नव्या पिढीत देशभक्तीची भावना, संस्कृतीबद्दल आस्था, विश्वासाचं प्रमाण वाढलं आहे. संघाच्या स्वयंसेवकांसह समाजातील व्यक्ती, संस्था मागास वर्गांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
माणसाचा विकास झाला, विज्ञान प्रगत झालं. देश वेगवेगळ्या पातळीवर जवळ आले. पण या परिवर्तनाची गती इतकी जास्त आहे की माणसांच्या बदलण्याचा वेग व विज्ञान-तंत्रज्ञान बदलण्याचा वेग याचा ताळमेळच राहिलेला नाही. त्यामुळेच माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. युद्ध, इतर कलह चालूच आहेत. निसर्गाचा कोपही होतोय. पण कुटुंबांमध्येही कलह होत आहेत. नागरी जीवना अनाचार वाढतोय. त्यावर उपायाचे प्रयत्न झाले आहेत. पण त्याचं पूर्ण निदान करण्यात अपयश आलं आहे. त्याउपर अस्वस्थता, कलह हिंसेला खतपाणी घालत आहे. जगात सर्व प्रकारच्या परंपरा, मांगल्य, संस्था यांचा पूर्णपणे विनाश परिवर्तनाने होईल असं मानणारा नवा विचार व समुदाय अस्तित्वात आला आहे. इतर ठिकाणी आहे, तसा भारतातही आजकाल हातपाय पसरू लागला आहे. सगळ्याच देशांमध्ये त्यामुळे समाजजीवन विस्कळीत झालं आहे. एक प्रकारे अराजकतेच्या दिशेनं सगळा समाज वाटचाल करू लागला आहे असं दिसत आहे. हे सर्व देशांमध्ये दिसत आहे. या परिस्थितीत जग भारताकडे अपेक्षेनं पाहात आहे.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
निसर्गासोबतच जनजीवनातही विस्कळीतपणा होत आहे. श्रीलंका, बांगलादेशमध्ये आपण हे पाहिलं. कधीकधी होतं असं. प्रशासन जनतेकडे राहत नाही. संवेदनशील राहात नाही. लोकाभिमुळ राहात नाही. तिथल्या जनतेची अवस्था लक्षात घेऊन धोरणं ठरवली जात नाहीत म्हणून असंतोष असतो. पण त्या असंतोषाला अशा प्रकारे व्यक्त करणं हे कुणाच्याच हिताचं नाही. कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणाचा संदर्भ दिला. त्यात अशा प्रकारच्या आंदोलनांना आंबेडकरांनी ग्रामर ऑफ अनार्की म्हटलंय. लोकशाही मार्गांनीही बदल घडू शकतो. हिंसक मार्गांनी बदल घडत नाही. गडबड-गोंधळ होतो पण परिस्थिती तशीच राहते. संपूर्ण जगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर जेव्हापासून अशा गोंधळाच्या क्रांती घडल्या, त्या कोणत्याच क्रांतीनं उद्देश साध्य केला नाही. फ्रान्सच्या क्रांतीनंतर नेपोलियन राजा झाला आणि राजेशाही कायम राहिली. सर्व साम्यवादी देश क्रांतीनंतरही भांडवलशाही तत्वांनुसारच चालत आहेत. अशा हिंसक क्रांतींमुळे देशाबाहेरील स्वार्थी शक्तींना आपल्या देशाविरोधात खेळ खेळण्याची संधी मिळते. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये गोंधळ होतोय. ते आपलेच देश आहेत. ते आपल्यापासून लांब नाहीत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतच होते. तिथे अशी स्थिती निर्माण होणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. ते फक्त आपले शेजारी आहेत म्हणून नाही, ते आपलेच देश आहेत म्हणून चिंतेचा विषय आहे. आपला आत्मीयतेचा संबंध आहे म्हणून चिंता आहे.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीचे दुष्परिणाम आपल्याकडेही दिसत आहेत. हिमालयाच्या भागात काय घडतंय आपण बघतोय. पावसाचं अनियमित होणं सगळीकडे आहे. निसर्काचे कोपही वाढले आहेत. अनियमित पाऊस होतोय. हिमनद्या सुकत आहेत. या गोष्टी गेल्या ३-४ वर्षांत वाढल्या आहेत. हिमालय आपल्यासाठी सुरक्षेची भिंत आणि दक्षिण-पूर्व आशियासाठी पाण्याचा स्रोत आहे. जर सध्याच्या विकासाच्या पद्धतीमुळे नुकसान वाढत असेल, तर आपल्याला त्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. कारण हिमालयाची आजची अवस्था धोक्याची घंटा वाजवते आहे.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण हे अवलंबित्व नाईलाजात बदलता कामा नये. कारण ही आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल. पण त्यात नाईलाज नसेल, सक्ती नसेल, आपली इच्छा असेल.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
आर्थिक क्षेत्रातही आपण पुढे वाटचाल करत आहोत. जगभरातल्या प्रस्थापित निकषांवर हे म्हणता येईल. आपल्या आर्थिक विकासासाठी आपल्या तरुण उद्योजकांमध्ये उत्साह, इच्छा, आकांक्षा दिसतायत. पण सध्याच्या प्रचलित अर्थप्रणालीत काही चुकाही दिसून येतात. विकासाच्या या पद्धतीमुळे श्रीमंत व गरीबांमधली दरी वाढते. आर्थिक केंद्रीकरण होतं. आपण चिंता केली नाही तर शोषणासाठी एक नवीन सुरक्षित प्रणाली उभी राहू शकते. माणसांच्या परस्पर व्यवहारांमध्ये व्यापारी दृष्टी व अमानवी गोष्टी प्रवेश करू शकतात. या दोषांची बाधा आपल्याला होऊ नयेय
देशातही अशांतता पसरवणारे कट्टर लोक, नक्षली यांच्यावर शासनानं कठोर कारवाई केली. त्यांच्या विचारधारेतला पोकळपणा व क्रूरतेमुळे समाजानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना नियंत्रित करता येईलच. पण नक्षलग्रस्त भागात न्यायाची स्थापना व्हावी, विकास पोहोचावा, समानता प्रस्थापित व्हावी यासाठी शासकीय योजना तिथे राबवल्या जायला हव्यात. त्या नसतात म्हणून अशा शक्ती प्रबळ होत असतात.
गेल्या वर्षभरातला कालावधी आपल्या आशा अधिक दृढ करतो. पण त्याचवेळी आपल्या समोरची आव्हानंही अधोरेखित करतो. प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला. संपूर्ण भारतात श्रद्धा व एकात्मतेची एक लाट त्यामुळे आली. गेल्या वर्षी पहलगामला हल्लाही झाला. २६ भारतीयांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली.त्यानंतर देशभर दु:खाची लाट पसरली. आपल्या देशाने पूर्ण तयारीनिशी, लष्कराने त्या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. या सगळ्यात आपल्या नेतृत्वाची दृढता, आपल्या सैन्याचं कौशल्य, समाजाच्या एकतेचं एक उत्तम चित्र उभं राहिलं. हा धडाही आपल्याला मिळाला की आपण जरी सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवत असलो, तरी आपल्या सुरक्षेबाबत आपल्याला सतर्क व्हावं लागेल. या घटनेनंतर जगातल्या वेगवेगळ्या देशांनी घेतलेल्या भूमिकेतून आपले मित्र कोण आहेत हे आपल्याला समजलं.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
लाल बहादूर शास्त्रींचीही आज जयंती आहे. भक्ती, समर्पण व देशसेवेची ही उत्तुंग उदाहरणे. व्यक्तीचं चरित्र कसं असायला हवं याचं मार्गदर्शन हे लोक आपल्याला करत असतात. आजच्या परिस्थितीत याच प्रकारचं जीवन आपण जगायला हवं अशी अपेक्षा आहे – मोहन भागवत
100 Years of RSS Nagpur Live Updates Ramnath Koving Speech: संघाच्या दसरा मेळाव्यात रामनाथ कोविंद यांचं भाषण…
माझं सुदैव आहे की मला संघाशी संबंधित अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन आयुष्यात मिळत राहिलं. मी पाहिलंय की संघाचे कार्यकर्ते भारतीय परंपरांमधील निरंतरता व एकतेला महत्त्व देतात.
100 Years of RSS Nagpur Live Updates Ramnath Koving Speech: संघाच्या दसरा मेळाव्यात रामनाथ कोविंद यांचं भाषण…
गेल्या काही वर्षांपासून मी माझं आत्मचरित्र लिहीत होतो. ते नुकतंच पूर्ण झालं आहे. माझ्या आयुष्यात स्वयंसेवकांशी माझ्या नातेसंबंधांमुळे माझ्या आयुष्याला दृढता मिळाली. त्यासाठी मी त्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानतो
100 Years of RSS Nagpur Live Updates Ramnath Koving Speech: संघाच्या दसरा मेळाव्यात रामनाथ कोविंद यांचं भाषण…
डॉ. हेडगेवार यांच्या विचारांमुळे समाज व राष्ट्राला समजून घेण्याचा माझा दृष्टीकोन स्पष्ट झाला. बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र दीक्षाभूमी व डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानाचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं.
100 Years of RSS Nagpur Live Updates Ramnath Koving Speech: संघाच्या दसरा मेळाव्यात रामनाथ कोविंद यांचं भाषण…
सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा. हा एक सुखद योगायोग आहे की आज महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. विजया दशमी उत्सवाचा हा दिवस संघाचा शतक पूर्ती दिनदेखील आहे. नागपूरची ही पवित्र भूमी आधुनिक भारताच्या विलक्षण निर्मात्यांच्या पवित्र स्मृतींशी जोडलेली आहे. त्या राष्ट्रनिर्मात्यांमधल्या दोन डॉक्टरांचा माझ्या जीवनात महत्त्वाचा हात होता. ते दोघे होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
100 Years of RSS Nagpur Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून शुभेच्छा
Heartiest greetings to all SwayamSevaks on the 100th Year of the @RSSorg Foundation Day!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 2, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना- शताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#RSS #RSSFoundationDay #RSS100Years #VijayaDashami #विजयादशमी #Maharashtra pic.twitter.com/0eWlulHfVu
100 Years of RSS Nagpur Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित आहेत.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: मोहन भागवत आज काय बोलणार?
सरसंघचालक मोहन भागवत आज दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणामध्ये नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे टॅरिफ, भारत-पाकिस्तान संबंध, क्रिकेटचे सामने, देशांतर्गत धार्मिक वातावरण, आरक्षणाचा मुद्दा, भाजपाशी सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर सरसंघचालक मोहन भागवत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
100 Years of RSS Nagpur Live Updates: सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमस्थळी दाखल
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदा संघाच्या दसरा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह कोविंद यांचं कार्यक्रमस्थली आगमन झालं आहे. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवरही कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत.
संघाच्या मंचावर जाण्यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दीक्षाभूमीत; म्हणाले, “समानता आणि न्याय…”
100 Years of RSS Nagpur Live Updates: शस्त्रपूजनाने होणार कार्यक्रमाला सुरुवात
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर शस्त्रपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Dussehra 2025 Live: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षं पूर्ण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भारत पाकिस्तान तणाव, क्रिकेटचे सामने आणि त्याअनुषंगाने देशभर चालू असलेल्या चर्चेवर मोहन भागवत संघाची अधिकृत भूमिका यावेळी स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसह युतीची घोषणा करणार? दसरा मेळावा शिवसेनेच्या इतिहासाचा नवा अध्याय लिहिणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेगळा दसरा मेळावा घेऊ लागले. तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसह युतीची घोषणा करणार का? याची शक्यता.
इथे वाचा सविस्तर वृत्त
Maharashtra Dussehra 2025 Live: विजयादशमीला राज्यभरात सहा मेळाव्यांतून शक्तिप्रदर्शन !
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. ठाकरे गटाचा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्क मैदानात होईल.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.
Dasara Melava 2025 Maharashtra LIVE, 02 October 2025: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.