Maharashtra News Updates, 29 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. रविवारी देखील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच राज्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजच्या दिवसभरातील पाऊस आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहाणार आहोत.
Maharashtra News Live Today : राज्यातील पावसाशी संबंधीत सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –
अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ महिला आणि बसचालकाची सुखरूप सुटका
नगर शहरात दोन गटात तणाव, दगडफेक, रस्तारोको, लाठीमार
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील सुविधा कळणार एका क्लिकवर
कृष्णविवराचे गुढ उकलण्यासाठी आयआयटी मुंबई ‘दक्ष’; प्रचंड क्षमतेच्या अंतराळ दुर्बिणीची करणार निर्मिती
राज्यात मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पावसाचे थैमान… मात्र हा ‘ओला दुष्काळ’ का ठरवता येत नाही?
Mumbai Metro: मेट्रो २अ व ७ मार्गिका : ३० स्थानकांतील जागा व्यावसायिक वापरासाठी; एमएमएमओसीएलचा महसूल वाढवण्याचा नवा मार्ग
पनवेल : गरब्यासाठी इमारती खाली गेले अन् ११ लाखांचे दागीने चोरले
खबर पीक पाण्याची: पीकविमा योजनेतील निकष बदलाला जबाबदार कोण ?
२००६ नंतर पहिल्यांदाच गोदावरी नदीला मोठा प्रमाणात पूर आला आहे. यामुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे, बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनचे शनी मंदिर संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. विशेष म्हणजे हे पाणी काही प्रमाणात गावात देखील शिरले आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
World Heart Day 2025: हृदयविकाराचा सर्वाधिक धोका ‘या’ त्रिकूटापासून… तज्ज्ञांचा सावध राहण्याचा सल्ला
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांची मोठी घोषणा… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्र अध्यासन…
‘एनआयआरएफ’ क्रमवारीबरोबर प्रवेशांतही घसरण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्या अभ्यासक्रमांना फटका?
Mumbai Rain: मुंबईत चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस ‘या’ भागात
World Heart Day: हृदयविकारांवर ‘स्टेमी’ची कवचकुंडले! ‘जागतिक हृदय दिना’निमित्त राज्यभरात वाढतेय जागरुकता…
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांची दिवाळी गोड होणार का? अजित पवारांचं महत्त्वाचं विधान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, याबद्दल विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, “या संदर्भात मी, मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं की, लोकांच्या अपेक्षा आहेत…. त्यांना असं काही सगळं द्यावं लागणार आहे, की त्यामधून त्यांना पुन्हा वाटलं पाहिजे की सरकार आपल्या पाठीशी आहे आणि आपण यातून बाहेर पडू शकतो, अशा पद्धतीचे निर्णय आम्ही घेणार आहोत,” असे अजित पवार म्हणाले.
नुकसान झालेल्या शेतकर्यांची दिवाळी गोड होईल का? याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, “दिवळीपर्यंतच हे सगळं जे काही सहकार्य करायचं आहे ते करण्याचं आमचं नियोजन आहे.” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
पावसामुळे भात शेती आडवी कापणी साठी तयार होत असलेली कणसे आडवी झाल्याने शेतकरी चिंतेत
कोथरूडमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तरुणावर हल्ला, मारहाणीत तरुण गंभीर जखमी
कांदिवली आग दुर्घटनेतील मृतांची संख्या तीन
Navi Mumbai Airport: दिबांचे नाव नाही तर विमानतळाचे उद्घाटन नाही; ६ ऑक्टोबरला भूमिपुत्रांचा धडक मोर्चा
पोलिसांना गुंगारा देणारा सराईत छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद
Mumbai Crime News: मालकाचे ४५ लाख रुपये घेऊन चालक, नोकर फरार; बिहारमधून दोघांना अटक
केवळ आठ वर्षात डागडुजी करण्याची वेळ; पडापड सुरु घणसोली जलतरण तलावाची देखभाल दुरुस्ती विना उडाली दैना…….
पनवेल येथील मुलींच्या बालगृहातून पाच मुलींचे पलायन; पाच पैकी तीन सापडल्या
भरधाव ट्रेलर कडून कामोठे पथकर नाक्याला धडक, कर्मचारी जखमी; शुक्रवार मध्यरात्रीची घटना
मुंबई शहर व उपनगरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भरती – दुपारी ३:२७ वाजता – ३.०१ मीटर ओहोटी – रात्री ९:३६ वाजता – १.५८ मीटर
भरती – पहाटे ४:५६ वाजता (उद्या, ३० सप्टेंबर २०२५) – ३.२२ मीटर ओहोटी – सकाळी ११:१७ वाजता (उद्या, ३० सप्टेंबर २०२५) – २.६१ मीटर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र
नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजाला गेल्या १० वर्षांमध्ये ५४ हजार कोटींच्या मदतीचा दिलासा
Nashik Rain Update : नाशिकमध्ये शनिवार रात्रीपासून पावसाचा हाहाकार, गोदाकाठची मंदिरं पाण्यात; तीन जणांचा मृत्यू तर २१ जणांचे वाचवले प्राण
शेतकऱ्यांचे ३०० कोटी रुपये थकविणाऱ्या साखर कारखान्यांना सरकारचे अभय; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे बळीराजाचे डोळे
मुंबई महानगरात आज मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने मुंबई महानगरात आज (सोमवार) दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. कृपया, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.