Maharashtra Breaking News Today, 25 October 2023 : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा मंगळवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईत दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावर आज वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावलं होतं. त्यावर जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतलं होतं. हे ४० दिवस उलटून गेले तरी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसतील. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आज राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल.
Mumbai News Live in Marathi : महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
ठाणे: गेल्याकाही दिवसांपासून माजिवडा, कापूरबावडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत माजिवडा पेट्रोल पंप जवळ मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारणीचे काम सुरू होणार आहे.
ठाणे: भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लघु अग्निरोधक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे दाटीवाटीच्या ठिकाणी पथकाला पोहचून आग शमविणे शक्य होणार आहे. वाहनांचे लोकार्पण दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील अरुंद जिन्यांवर सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांच्या होणाऱ्या अधिकच्या गर्दीमुळे बहुंताश वेळा चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती होत असते.
नागपूर: दीक्षाभूमीचे विकास पर्व सुरू झाले असून आता २०० कोटी या कामासाठी दिले. जगातील लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी यासाठी जागतिक दर्जाचाविकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
चंद्रपूर: चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.
पुणे: कामावरुन काढल्याने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड करण्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे: पुणे-सोलापूर लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आल्याने घोरपडीतील रेल्वे फाटक गुरुवारी (२६ ऑक्टोबर) रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून संपूर्ण शहरात स्वागताचे बॅनर, पोस्टर, स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या.
आपण कोणत्याही वस्तुची खरेदी केली नाही तरी, आपल्या बँक खात्यामधून अचानक ८८ हजार ५०० रूपये कसे वळते झाले असा प्रश्न तक्रारदाराला पडला.
गणवेशात रिल्स बनवून समाज माध्यमांवर अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षांपुर्वी काँक्रीटीकरण केलेल्या या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनीही सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांना भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हमाले, ते उद्धव ठाकरे यांचं राजकीय वक्तव्य आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. परंतु, आमची सर्वच पक्षांबद्दल आणि नेत्यांकडे प्रामाणिक मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच आमची एकमेव मागणी आहे.
संजय राऊत म्हणतात, “तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. आम्हाला न्यायालयाचाही निर्णय नकोय. गरज नाही आम्हाला त्याची!”
मनोज जरांगे पाटील
आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन
शिवसेनेच्या शिंदे गटाचा मंगळवारी मुंबईतल्या आझाद मैदानात दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. दुसऱ्या बाजूला, मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. कारण, त्यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे.