Article Body Starting : Maharashtra News Today, 08 November 2023 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा आमने-सामने आले आहेत. आज दिवसभरात आपल्याला यासंबंधीच्या बातम्या पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशपातळीवर याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यासंदर्भातल्या बातम्याही आज पाहायला मिळतील.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

12:58 (IST) 8 Nov 2023
ताडोबात सात वाघ एकाच वेळी एकत्र

चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचे कुटुंब एकत्र दिसले. सात वाघ एकाच वेळी दिसण्याचा हा दुर्मिळ प्रसंग कॅमेरा मध्ये टिपण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 8 Nov 2023
सर्व सेवा संघ करणार देशभरात आंदोलन; अध्यक्षपदी चंदन पाल यांची निवड

वर्धा: सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी चंदन पाल यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सेवाग्राम आश्रमात संपन्न सेवा संघाच्या ९०व्या अधिवेशनात देशभरातील १५ राज्यातून तीनशेवर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 8 Nov 2023
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणीटंचाई; नेरुळ, सारसोळेवासीयांचा आंदोलनाचा इशारा

लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सोबत घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 8 Nov 2023
आता मैदानांच्या जमिनीवर शाळा, शाळांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव चटई निर्देशांक वापराची व्यवस्थापनांना मुभा

उपनगरांमध्ये उभारलेल्या शाळांच्या जुन्या इमारती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर असून यासंबंधी आखण्यात आलेल्या नव्या धोरणामुळे शाळा आणि मैदानांचे चित्रच पालटणार आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 8 Nov 2023
विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमजोर, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची स्पष्ट कबुली

पत्र परिषदेत तटकरे यांनी सतत २५ वर्ष विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर असल्याचे मान्य केले.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 8 Nov 2023
धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 8 Nov 2023
नौदल अधिकाऱ्याकडे सेक्सटॉर्शनची मागणी; अडीच लाखांची खंडणी स्वीकारली

नौदल अधिकाऱ्याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 8 Nov 2023
रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आपतकालीन खिडकीतून मुलगा रेल्वेत दाखल झाला. त्यानंतर आसनावरील लोखंडी साखळीच्या सहाय्याने गळाफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 8 Nov 2023
“हसन मुश्रीफ महादेव अ‍ॅपचे सदस्य”; राऊतांच्या आरोपावर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आल्याने या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (३ नोव्हेंबर) केला आहे. यावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “भूपेश बघेल भाजपात गेले किंवा त्यांनी भाजपाला मदत केली तर भाजपात त्यांना देवाचं स्थान मिळेल. हे लोक ‘महादेव अ‍ॅप’चं ‘हर हर महादेव अ‍ॅप’ करतील. भूपेश बघेल यांच्यावर अभिषेक केला जाईल. हे अगदीच खरं आहे. तुम्ही हवं तर महाराष्ट्रात पाहा. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेसुद्धा महादेव अ‍ॅपचे सदस्य आहेत. आता त्यांची पूजा केली जात आहे. तुम्ही (भाजपा) यांना तुरुंगात डांबणार होता. परंतु, आता यांची पूजा करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार-भुजबळ-मुश्रीफांवर फुलं उधळत आहेत.” संजय राऊत यांच्या या टीकेवर आता मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, हे महादेव अ‍ॅप काय आहे तेच मला माहिती नाही. मी संजय राऊतांना भेटलो तर त्यांच्याकडून याची माहिती घेईन. तसेच महादेव अ‍ॅप काय आहे ते जाणून घेईन.

10:24 (IST) 8 Nov 2023
“…तेव्हा तुमचा हिशेब होईल”, ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं पोलीस-ठाणे महापालिकेला इशारा

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शाखेवर महापालिकेने कारवाई केली आहे. या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला असून त्या जागी नवीन इमारत बांधली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाखेवर झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून सरकारला धारेवर धरलं.

खासदार राऊत म्हणाले, मुळात राज्यातल्या बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. या घटनाबाह्य सरकारच्या गुंडांनी आणि माफियांनी ठाणे-मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला. ज्या शाखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केल्या, त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. असं करताना यांना लाज वाटत नाही का? महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का? हिंमत असेल तर समोर या. ठाण्यातल्या या सगळ्या प्रकारामुळे येत्या ११ नोव्हेंबरला सायंकाळी चार वजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे शिवसेनिक मुंब्र्याला जाणार आहोत. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला तिथे आम्ही जाणार आहोत. जनतेला भेटणार, त्यांच्याशी संवाद साधणार. हवं तर बुलडोझर घेऊन या आणि आमच्यावर फिरवा.

खासदार संजय राऊत म्हणाले, माझं पोलिसांना आव्हान आहे, लवकरच तुमचाही हिशेब होईल. ज्यांनी बुलडोझर फिरवले त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान आहे, २०२४ नंतर तुमचाही हिशेब केला जाईल. याला तुम्ही इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा, तुम्ही याला काहीही म्हणू शकता.

बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जात सर्वेक्षण करून राजकारणाचा एक नवा पायंडा पाडला. नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची इच्छा बोलून दाखविली आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरीदेखील दिली. आता ९ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण वाढविणार असल्याचे सांगितले.