Marathi News Updates : राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. तर, दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांचं निलंबन करण्याकरता याचिका केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होईल. तसंच, बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

Live Updates

Maharashtra News Today 29 January 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा 

11:51 (IST) 29 Jan 2024
बुलढाणा : ढीगभर ‘नोटा’ घेऊन कारने निघाले मात्र…

बुलढाणा: भोळ्याभाबड्या, हावऱ्या लोकांना फसविण्यासाठी नकली नोटांचा साठा व पूरक साहित्य घेऊन ते निघाले खरे, मात्र कुणाची ‘शिकार’ करण्यापूर्वीच ते स्वतःच पोलिसांची शिकार ठरले!…

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 29 Jan 2024
राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ

अजित पवार गटाविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

10:52 (IST) 29 Jan 2024
“१० पक्षांतर पचवून ढेकरे दिली त्या व्यक्तीला…”, राहुल नार्वेकरांवर राऊतांचं टीका

ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केलं. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणं हा सर्वांत मोठा फ्रॉड आहे. ४० लोकांनी पक्षांतरे केली, त्या विधिमंडळ गटाच्या फुटीर पक्षाला मान्यता दिली. अशा व्यक्तीला बक्षिस म्हणून पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवलं. काय महान माणूस आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर हेच त्यांना घटनातज्ज्ञ सापडले का. हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. संविधान निर्माण झालंय त्यानुसार हे सर्व आमदार बरखास्त व्हायला पाहिजे. पण राहुल नार्वेकरांनी भाजपाचा हस्तक म्हणून निर्णय दिला – संजय राऊत</p>

महाराष्ट्र ब्लॉग

Maharashtra News Today 29 January 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा