Marathi News Updates : राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. तर, दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांचं निलंबन करण्याकरता याचिका केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होईल. तसंच, बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Maharashtra News Today 29 January 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा
राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिकांनी मागील आठ वर्षांपासून केलेल्या मागणीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
वंदना आणि ऋषभ हे दोघेही महाविद्यालयात असताना एकमेकांवर प्रेम करत होते. वंदनाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीत काम करीत होती.
सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून अभ्यासकांना खुणावत असते.
तहसीलदारांच्या आदेशाने सर्वेक्षणाचे काम करणार्या एका शिक्षकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
वागळे इस्टेट येथील समतानगर जलवाहिनी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील एका बेकायदा भंगाराच्या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.
थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे पाहून पोलीस यंत्रणाही अवाक झाली आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर लघुशंकाला जातो अशी सबब पुढे करून आरोपी ठाणे अंमलदार यांच्या कक्षामध्ये काही काळ बसून राहिला होता.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे मांडली असल्याने कुठलाही तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे वातावरण दूषित करत नाहीत. देशात झुंडशाहीने कायदे बदलत नसल्याचे सत्य त्यांनी अधोरेखीत केले आहे. असे सुधीर मुनगंटीवार नाशिक मध्ये म्हणाले.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात एनटीपीसी ग्रीन एनर्जी, अवादा ग्रीन हायड्रोजन, रिन्यु ई-फ्युअल्स, आयनॉक्स एअर प्रॉडक्टस्, एल.एन.टी. ग्रीन टेक, जे. एस. डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन, वेलस्पन गोदावरी जीएच २ या सात विकासकांच्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे २ लाख ७६ हजार ३०० कोटी… https://t.co/wVIbCV34Kl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2024
कार्तिकच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनीसोबत ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए… pic.twitter.com/kRicQmrc5b
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2024
दुबईचे चलन बदलण्याच्या बहाण्याने सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या एका इसमाला दोघांनी चार लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
आम आदमी पक्ष देखील महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने शनिवारी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
ठाण्यातील घोडबंदर येथील वाघबीळ मधील कावेसर भागात ४०० ते ५०० वृक्ष तोडण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येत असून ही वृक्षतोड एका विकासकाने केल्याची चर्चा आहे. कत्तल झालेल्या वृक्षांमध्ये हेरिटेज वृक्षांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव. बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख.
पनवेल महापालिकेचे काम करताना स्वतः आणि सहकारी कर्मचाऱ्याचे रिल्स बनवून ते रिल्स समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करणे पनवेल महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. महापालिका आयुक्तांनी कामाच्या वेळेस केलेल्या उपद्रवाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.
राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील एका नाल्यात एक नवजात अर्भक सापडले आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून उपचारांसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Maharashtra | A newborn baby girl was found abandoned inside a drain in the Malad area of Mumbai. Dindoshi Police have registered a case against an unknown person. The baby girl has been admitted to a local hospital.
— ANI (@ANI) January 29, 2024
बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे राज्यामध्ये नैराश्यग्रस्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी व त्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या कॉल सेंटरवर वर्षभरात तरुणांनी सर्वाधिक दूरध्वनी केले आहेत.
गुन्हेगारालाच न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी बघितले का?
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 29, 2024
काय सांगता, नाही बघितले मग राहुल नार्वेकरांना बघून घ्या, महाराष्ट्रात दिवसाढवळ्या ज्यांनी लोकशाही व्यवस्थेचा मुडदा पाडला. त्याच नार्वेकरांची देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे!!@rahulnarwekar
छत्रपती संभाजीनगर – येथील सिडकोच्या एन-३ भागातील एका सदनिकेतील घराला अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ७.२४ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. सिडकोतील जालना रोडजवळील एपीआय कॉर्नरसमोर दामू अण्णा यांच्या घरानजीकच्या सदनिकेतील तिसऱ्या मजल्यावरील एका घराला लागली. अग्निशमन दलाच्या चिखलठाणा येथील पथक व सिडको अग्निशमन केंद्र मदतीसाठी रवाना झाले. घरातील सर्व साहित्य, सांसारिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याला सहकार्य करणारे ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करून अटक करण्याची परवानगी पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागण्यात आली आहे. पण, भाजपच्या एका मंत्र्याच्या दबावामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या फाईलवर नकारार्थी शेरा मारला आहे, असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉ. संजीव ठाकूर यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप सोमवारी केला केला. संजीव ठाकूर यांची बदली सरकारने नाही तर मॅटने केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
पुणे : परदेशी चलन व्यवसायात (फाॅरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : जामीनदाराची बनावट स्वाक्षरी करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी, त्यांचा मुलगा आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नाशिक : नागरी सहकारी बँकांना प्राप्तीकरात सवलत अथवा त्याचा दर कमाल १० टक्के इतकाच ठेवणे, जलद थकबाकी वसुलीसाठी बँक अधिकाऱ्यांनाच विशेष वसुली अधिकारी म्हणून नेमणूक करून लवाद म्हणून घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणीचे अधिकार देणे आणि कोणत्याही बँकेला आर्थिक दंड केल्यास त्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळ व प्रसारमाध्यमांमधून प्रसिध्द करू नये, असे् विविध ठराव महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकांच्या परिषदेत मंजूर करण्यात आले. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अडचणीत येऊ शकणाऱ्या सुस्थितीतील बँकांना भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्व नागरी सहकारी बँकांच्या निव्वळ नफ्यातून काही रक्कम एकत्र करून राष्ट्रीय सहकार निधी तयार करावा. या निधीतून अशा बँकांना अल्प दराने निधी पुरवठा करण्याची संकल्पना मांडली गेली.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स संघटनेच्या वतीने आयोजित नागरी सहकारी बँकांच्या परिषदेचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सहकार आयुक्त अनिल कवडे, आमदार सीमा हिरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.
नागपूर : मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनामुळे सरकारने त्यांच्या सरसकट सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येण्याची शक्यता आहे, अशी भावना तयार झाली आहे. मात्र दुसरीकडे सरकारमधील आणि सरकारबाहेरील ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
“राष्ट्रवादी फुटीप्रकरणी निवडणूक आयोगाचा निर्णय केव्हाही येऊ शकतो. आजही हा निकाल लागू शकतो. किंवा या आठवड्याभरात हा निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालाचा परिणाम विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटातील वकिलांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वेळा येथे स्व. बापूराव देशमुख सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. मात्र त्याची अखेर लिलावात झाली आहे.
महाराष्ट्र ब्लॉग
Maharashtra News Today 29 January 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा