Maharashtra News Highlights: उपराष्ट्रपतिपदासाठी आज (९ सप्टेंबर) निवडणूक पार पडणार आहे. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन सेड्डी व एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बीआरएस, बीजेडी व शिरोमणी अकाली दल हे पक्ष या निवडणुकीत मतदान करणार नाहीत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून आपण या निवडणुकीचे सर्व अपडेट्स या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, “काही लोकांना वाटत होतं की माझी राख होतेय, तेवढ्यात मी भरारी घेतली. मी आव्हानांपासून पळून गेलो नाही.” यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ शकते.
मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टीमेटम
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटमधील नोंदींप्रमाणे मराठा कुटुंबांना जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अन्यथा मराठवाडा मुक्तीदिनी आयोजित कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांवर बंदी घालू.
आज राज्य सरकारची ओबीसी संघटनांबरोबर बैठक
दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाबरोबर बैठक होणार आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार परिणय फुके यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ या बैठकीला जातात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींकडे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्राशी संबंधित बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.
कृत्रिम तलावासाठी लाखो लिटर पाण्याचा विहिरीतून उपसा
मुंबईत पुढील काही दिवस पावसाची विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज काय, जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती
“भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैसे वापरण्याची चटक”, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक संवैधानिक नियमानुसार व्हायला हवी. परंतु, भाजपाचं चारित्र्य काही चांगलं नाही. प्रत्येक निवडणुकीत पैशांचा वापर करायची त्यांना चटक लागली आहे. मी असं म्हणत नाहीये की उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पैशाचा वापर होतोय. कारण इंडिया आघाडीची मतं ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षांमधील लोकांनी भूमिका बदलली आहे. बीजेडी, शिरोमणी अकाली दल, बीआरएस या पक्षांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांनी भाजपाप्रणित एनडीएला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता. त्यांनी एकगठ्ठा एनडीएला मतदान करावं असं भाजपाचं मत होतं. परंतु, या पक्षांनी भाजपाचं ऐकलं नाही. त्यांनी निवडणुकीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते इकडे किंवा तिकडे गेले नाहीत.”
Ganesh Naik : नालायक अधिकाऱ्यांना आडवे करणार – गणेश नाईकांचा इशारा
सरकारच्या अधिसूचनेविरोधात दोन दिवसांत न्यायालयात जाणार : भुजबळ
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात येत्या दोन दिवसांत न्यायालयात दाद मागणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की अधिसूचना काढण्यापूर्वी सरकारने भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. आम्ही त्यांना सांगितलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही.
काँग्रेसही मराठा आरक्षणसंबंधी राज्य सरकारच्या जीआरविरोधात
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर (जीआर) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. या अधिसूचनेतील सरसकट आरक्षणाला आमचा कायमच विरोध आहे असं वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी सरकारविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा चंग बांधला आहे. तसेच छगन भुजबळांना सोबत घेऊन लढाई लढण्याबाबत चर्चा करू असंही वडेट्टीवार म्हणाले.