Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. अनेक नेत्यांचे विविध भागात दौरे सुरू आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यात काही महत्वाचे निर्णय होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत असून गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, याच मुद्यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या बरोबरच लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याचा निधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai News Live Updates : राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Cyber Crime In India: आर्थिक गुन्हेगारीत ३६ टक्क्यांची वाढ
राज्यात एक कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी! उच्च रक्तदाब, मधुमेहासह कर्करोगाचा धोका जास्त
पुण्यात नवीन आयटी पार्क अशक्य? विजय शिवतारेंच्या पुरंदरच्या प्रस्तावाचं काय होणार…
पिंपळे गुरवमधील कल्पतरू चौकातील कोंडी सुटणार; महापालिका भुयारी मार्ग बांधणार
पिंपरीसाठी लवकरच मुळशी धरणातील पाणी आरक्षित; श्रीमंत महापालिकेचा काळ गेला; असे का म्हणाले आयुक्त…
भिडे पुलावरील वाहतूक पूर्ववत; सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत भिडे पूल वाहतुकीस खुला
शस्त्रपरवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्र्यांकडून शिफारस; नीलेश घायवळच्या भावासाठी शिफारस केल्याचे उघड
पुण्यातील प्रभागरचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात पहिली याचिका कोणी केली दाखल ?
पुण्यात बेकायदा फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात, दोन दिवसांत इतक्या जणांवर गुन्हे !
Illegal Gutkha Seized: खर्रा आणि गुटखा कारखाना उघडकीस ; १२५६ किलो तंबाखूसह १५ किलो खर्रा जप्त
Indian Railways Updates: इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस तब्बल ३० दिवस रद्द …
Robotic – AI surgery : रोबोटिक आणि एआय सर्जरीमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल!
“शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत दाखवली नाही, आता किमान…’, रोहित पवारांची सरकारवर टीका
“राज्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेला शेतकरी, सरकारची तुटपुंजी मदत, कायदा व सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, आरक्षणाचे विषय, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि एकूणच निर्माण झालेली अराजकता या परिस्थितीत हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवाने हे सरकार या ठिकाणी देखील पळ काढताना दिसत असून अधिवेशन केवळ दहा दिवसांचं घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना काळात केंद्राच्या सूचना, सर्वत्र भीतीचे वातावरण, कोरोना प्रसाराची भीती या पार्श्वभूमीवर जास्त दिवस अधिवेशन घेता येत नव्हतं. त्या काळात जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज गप्प का?सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत तर दाखवली नाही, आता किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची हिंमत तरी दाखवावी”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गुंड निलेश घायवळच्या भावाला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना? योगेश कदमांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्याकडे…”
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. निलेश घायवळने परदेशात पलायन केलं असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. यातच आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठीसामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी हा निधी वापरण्यात याव्यात अशा सूचना केली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
