Maharashtra News Live Updates, 13 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असून सर्वच नेते आपआपल्या पक्ष संघटनेचा कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच राज ठाकरे यांनी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंची तीन महिन्यांतली ही सहावी भेट होती, त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी महायुतीतीलच भाजपावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत भाजपाकडून पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आत्राम यांनी केल्यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai News Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

10:19 (IST) 13 Oct 2025
“महायुतीत दंगा नको…”, रवींद्र धंगेकरांची भेट घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?

“रवींद्र धंगेकर आणि माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे की महायुतीत दंगा नको. मात्र, रवींद्र धंगेकरांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा-सुव्यस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होता कामा नये. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

10:19 (IST) 13 Oct 2025

अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका, भाजप मात्र सलामत; माजी महापौर किशोरी पेडणेकर…

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण निघणार असल्याची चर्चा असली तरी अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केल्यामुळे याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील १५ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होणार आहेत तर भाजपच्या केवळ दोन माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होत आहेत. भाजपचे हे दोन्ही माजी नगरसेवक आधीच आरक्षित प्रभागातून आलेले आहेत. त्यामुळे या दोघांनाही फटका बसणार नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचाही प्रभाग आरक्षित झाला आहे.

सविस्तर वाचा

अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका, भाजप मात्र सलामत; किशोरी पेडणेकर…, (फोटो-संग्रहित छायाचित्र)