Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. तसंच आमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. शिंदे फडणवीसांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. या आणि राज्यातल्या विविध घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Marathi Breaking News Live| “सत्तेची हाव नाही तर शपथ का घेतली?” संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल; यासह महत्त्वाच्या घडामोडी
बुलढाणा : मागील जुलै महिन्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हानीची व्याप्ती इतकी भीषण होती की याचे सर्वेक्षण करायला महिना लागला! जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी नुकसानीचा हा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. शासनाकडे १६१ कोटींची मदत मागण्यात आली आहे.
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात संप पुकारला होता. शासनाने याबाबत समिती नेमून वेळ मारून नेली. मात्र अद्याप समितीचा निर्णय काही झाला नाही. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने अलीकडेच एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत आग्रह धरण्यात आला आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणारे व ज्यांनी अद्यापपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व पथविक्रत्यांना (छोटे व्यवसायिक) या योजनेचा लाभ घेता येईल.
या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखे राबविले जाते. तेथील शिक्षकांना ज्ञानदानाऐवजी राजकीय कामात जुंपले जात असल्याने शैक्षणिक दर्जा खालावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा सूर भुसे यांनी लावला.
गोंदिया : जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता पोलीस विभागाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. याअंतर्गत मागील ५० दिवसांत ५ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उगारताच वाहन चालकही आता हेल्मेटला प्राधान्य देत असल्याचे सुखद चित्र आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामीण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असून यातून विविध टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांकडून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात टोळीयुद्ध, रक्तरंजित संघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती, बीड व पिंपरी-चिंचवडमधील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळून सावध पवित्रा घेतला तर छगन भुजबळ यांनी शरद पवार हे केवळ मराठेतर नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेतात, असा थेट हल्ला चढवून पवारांना लक्ष्य केले.
अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. मंगेश जानराव तायडे (२८, रा. रामगांव ता.व जि. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पीडितेचा चुलत काका आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालय आणि या भागातील व्यापारी संकुलासमोर सकाळीपासून चारचाकी, दुचाकी वाहने दोन ते तीन रांगांमध्ये उभी केली जातात.
नागपूर-शहडोल एक्स्प्रेस साप्ताहिक गाडीची नियमित सेवा ४ नोव्हेंबर पासून सुरु होईल. ११२०१ नागपूर-शहडोल एक्स्प्रेस नागपूरहून ११.४५ वाजता सुटेल. नागपूरहून दर सोमवारी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.२९ वाजता शहडोलला पोहोचेल.
भंडारा ते भंडारा रोड रेल्वेस्थानकापर्यंत दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गाने जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या मार्गावर दररोज अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जून महिन्यात उशिराने आलेला मान्सून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली मोठी विश्रांती यामुळे पावसाचा तुटवडा अजूनही आहेच. तरीही आता मान्सूनच्या परतीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून राज्यात मान्सून परतणार आहे.
एका वाहनचालक युवकाशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास सांगितल्यानंतरही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११ वाजता वाडीत घडली. प्रणाली दहाट (३०,त्रिशरण चौक, वाडी) असे मृत महिलेचे तर ललीत रामदास डहाट (४५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
अनैतिक संबंधामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मात्र, प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या प्रेमविरांची काही कमी नाही. अशाच प्रेमसंबंधातून एका प्रेमविराने प्रेयसीला मारहाण करणाऱ्या तिच्या पतीचा काटा काढला. प्रेयसीला मारहाण केल्यामुळे तिच्या पतीचे गुप्तांग ठेचून खून केला.
कुणी आप्तस्वकीय नसल्याने तिला या केंद्रात आधार मिळेल हा विश्वास दाखल करणाऱ्या नागरिकांना होता. त्यांनी केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना तिची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्या वृद्घेच्या पायाला गँगरीन झाला होता. अशा अवस्थेत ती दिवस काढीत होती.
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम
Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारामवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे.