Mumbai Latest News Live Update : लोकसत्ता ऑनलाइन’वर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई-पुण्यातल्याच नव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम ‘लोकसत्ता ऑनलाइन’ करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेडिंग, क्रीडा, राशिभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन ‘लोकसत्ता ऑनलाइन’वर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरूपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेअर बाजार यासंबंधीच्या बातम्या ‘अर्थसत्ता’ सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहनविषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टेक्नॉलॉजीविषयीच्या बातम्या टेक् सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून ते थेट हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर ‘चतुरा’ हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलीवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपात माहिती सादर केली जाते. राशिभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादींची माहिती देण्यात येते.
Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देश, विदेशातील घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या…
स्थानिक आदिवासींच्या प्रचंड विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील खाणीमध्ये यशस्वीपणे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे शासनाने त्याठिकाणी पुन्हा सहा नव्या खाणी प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी देशभरातील तब्बल वीस कंपन्या उत्सुक असून यात काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा देखील समावेश असल्याचे कळते. सविस्तर वाचा…
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २७१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नव्या प्रशासकीय भवनासाठी सेतू केंद्र, खनिकर्म, संजय गांधी निराधार भवन, शहर तहसील कार्यालयाची इमारत पाडली जाणार आहे. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच नागपूर दौरा आटोपला. या दौ-यात पवार यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर खास गडकरी यांच्या आग्रहाखातर पवार यांनी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जागतिक दर्जाच्या संगीत कारंजी शो बघितला. सविस्तर वाचा…
नवी मुंबई : कोपरखैरणे भागात बेकायदा भारतात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांना भारतीय असल्याचे दाखवणारी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या एजंटलाही अटक करण्यात आली असून, अन्य एक आरोपी फरार आहे.
बीकेसी परिसरात दोन तरुणींना दुचाकीवर बसवून धोकादायक साहसी कृत्ये करणाऱ्या दुचाकीस्वाराला अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या साहसी कृत्यांची चित्रफीत समाज माध्यमांवर खूप वायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सविस्तर वाचा…
डोंबिवली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने राष्ट्रभक्त सावकर यांचा अवमान केला जात असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाकडून डोंबिवली शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर राहुल गांधी यांचा निषेध करणारे फलक लावण्यात आले आहेत.
पुणे : आठ वर्षांच्या मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण – आम्हाला कल्याण जवळील शहाड येथील बिर्ला मंदिरात देवदर्शनासाठी जायचे आहे. दर्शनानंतर थेट आम्हाला ठाणे येथ जायचे आहे, असे सांगून प्रवासी म्हणून रिक्षात बसून चालकाला गुंगीचे औषध टाकलेला प्रसादाचा पेढा देऊन त्याला गुंगी आली की त्याच्या जवळील रोख रक्कम, हातामधील अंगठ्या, रिक्षा घेऊन पसार होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून डोंबिवली, कल्याणमध्ये वाढले आहेत. अशाप्रकारे लुटीच्या कल्याणमध्ये दोन, डोंबिवलीत एक घटना घडली आहे.
पिंपरी : टिंडर डेटिंग ॲपवरून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या अभियंता तरुणीवर अत्याचार, शिवीगाळ करत मारहाण करून तिचा डोळा फोडला. गळ्याला चाकू लावून तिच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला घरात डांबून ठेवले. हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२२ ते रविवार २ एप्रिल २०२३ पर्यंत लक्ष्मी चौक हिंजवडीत घडला.
पुणे : पुण्यातील व्यावसायिकांवर सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) सोमवारी छापे टाकण्यात आले. ईडीच्या पथकाने शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले.
PM Modi’s Education: “मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी ‘एम. ए.’ केले. त्यामुळे ते ‘अनपढ’…!”
श्रीकांत शिंदे म्हणतात, “ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना खोकेच दिसतात. मध्यंतरी आमदार सुहास कांदे यांनी…!”
संजय राऊत म्हणतात, “तुम्ही त्यांना आत्ताही फोन केला, तरी त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल. मी त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं…!”
एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस आयुक्त कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत”, असा प्रश्न जलील यांनी विचारला. तसेच दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यातील मंत्री गँगस्टरप्रमाणे वागत होते, असा आरोप केला. ते औरंगाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
भाजपाने दंगली घडवण्यासाठी एक विंग तयार केली आहे. त्यांच्याकडून या दंगली घडवल्या जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. माझं अमित शाह यांना सांगणं आहे २०२४ ला दंगल करणाऱ्यांना लटकवण्यापेक्षा आत्ताच लटकवा असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच मोदींच्या डिग्रीचा मुद्दा जरी समोर आलेला असला आणि त्यावरून चर्चा होत असली तरीही आम्ही अदाणींचा सोडलेला नाही. अदाणींचा मुद्दा मागे पडला आहे असं समजू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“मोदींची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात. पण, मी म्हणतो – ‘Entire Political Science' या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. मोदींची डिग्री फ्रेम करून संसद भवनात लावा,” असा टोला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हमारे प्रधानमंत्री मोदीजी की ये जो डिग्री है,लोग कहते हैं कि यह बोगस है, लेकिन मैं मानता हूं कि 'Entire Political Science' शोध विषय पर ये ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री है.इसे नए संसद भवन के मुख्यद्वार पर फ्रेम करके लटकाना चाहिए.ताकि लोग प्रधानमंत्री जी की योग्यता पर सवाल न उठाएं. pic.twitter.com/d5dnL4nZvk
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2023
“गौरव यात्रा काढण्याचं आठवत आहे. तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर केंद्रात तुमच्या विचारांचं सरकार आहे. राज्यात तुम्ही लोक बसत आहात. सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हालाही अभिमान असेल, तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न द्या. तुमच्यात हिंमत आहे का?,” असे आव्हान अजित पवारांनी शिंदे-भाजपा सरकारला दिलं होतं. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देशातील पदवीधार तरुणांना नोकरी मिळत नाही. दुसरीकडे पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हटलं, तर २५ हजारांचा दंड ठोठावला जातो. अशी कोणत्या महाविद्यालयाची पदवी पंतप्रधानांकडे आहे?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.