Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केलेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे.
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
“तुमच्याकडे असलेली औषधे घ्या अन् उपचार करा”, रक्तस्राव थांबवण्यासाठी रुग्णालयाचा रुग्णाला सल्ला?
“मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे असलेली औषधं असतील ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करण्यास रुग्णालयाने सांगितलं. या सर्व कालावधित रुग्णाची मानसिकता खचून गेली”, असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
“साडेपाच तास गर्भवती महिलेवर कोणतेही उपचार झाले नाहीत”, रुपाली चाकणकर यांची माहिती
गर्भवती महिला ९ वाजून १ मिनिटांनी दाखल झाली. पण पुढील साडेपाच तास त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाही. दरम्यानच्या काळात गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला – रुपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
“ठाणे जिल्हा भाजपाचाच बालेकिल्ला”, आमदार केळकरांनी शिंदेंना डिवचलं?
ठाण्यात भाजपाचे ९ आमदार आहेत. नऊच्या जवळपास कोणीही नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा भाजपाच्या बालेकिल्ला आहेच. त्यामुळे महापालिकेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आणणं, लोकांचं समर्थन मिळतंय, सामान्य जनतेचा भाजपावर विश्वास आहे. हा पक्ष वाढत जाईल. वेळ पडेल तेव्हा सर्वांना सोबत घेऊन जाणार. परंतु, भाजपा आता थांबणार नाही – संजय केळकर, आमदार, भाजपा
कुणाल कामराच्या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार
#Breaking Bombay High Court to consider tomorrow Kunal Kamra's plea seeking quashing of FIR filed against him over his 'Gaddar' jibe allegedly directed at Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde. pic.twitter.com/3Qd7cIEnAl
— Bar and Bench (@barandbench) April 7, 2025
Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! वॉटर टँकर सेवा बंद होणार, ८० वर्षांपूर्वीचा व्यवसाय का बंद होतोय?
Water Tanker Service in Mumbai : धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आधीच मुंबईतील पाणीपुरवठा कमी झाला असून आता त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० एप्रिलपासून मुंबईथील वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
एका महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी केलेला नाही. हा आरोप गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. अमित शाहांच्या सीडीआरचा उल्लेख करत हा आरोप केला आहे. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नाव घेऊन आदळआपट करण्याची आवश्यक नाही. त्यांना काही सांगायचं असेल तर त्यांनी अनिल थत्तेंकडे मागावेत. नाथाभाऊचे नाव कशाला घेता, मी आरोप केलेले नाहीत. अनिल थत्तेंच्या चॅनेलचा हवाला देऊन मी बोललो. यामागचं सत्य काय आहे ते सांगा अन्यथा अनिल थत्तेंवर कारवाई करा – एकनाथ खडसे
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा