Marathi News Today, 24 May 2023 : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. राजकीय भेटीगाठीही वाढल्या आहेत. शिंदे गटातील काही आमदार आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
Maharashtra News Today : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
वर्धा: आधार नोंदणी आधारे संचमान्यता करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यासाठी आधार वैध करण्याचे काम तत्परतेने करणे आवश्यक ठरते. शिक्षणाधिकारी कार्यालयावर या कामाची विशेष जबाबदारी टाकण्यात आली.
मुंबई : देशातील आघाडीच्या दंत महाविद्यालयामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा समावेश असून देशभरातील विद्यार्थ्यांचा नायर दंत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडे कल असतो. मात्र महाविद्यालयामध्ये सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा अभ्यासक्रमाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले. एक गोष्ट नक्की नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करतात, मात्र आम्ही राजकारणा पलिकडे जाऊन नातं जपतो. २०२४ लोकसभा निवडणूक येत आहे. ही गाडी सुटली तर देशातील लोकशाही गायब होईल. लोकशाहीच्या विरोधातील लोकांविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत.
– उद्धव ठाकरे</p>
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलीस ठाण्याच्या आवारातील १९८६ पासून बेवारस आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सध्या भोसरी पोलीस घेत आहे.
मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी राखीव असलेल्या रांजनोळी येथील १,२४४ घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (‘एमएमआरडीए’) गिरणी कामगारांना दिले आहे.
नवी मुंबईतील किल्ले गावठाण उड्डाणपुल नजीक टायर फुटल्याने कंटेनर चालकाने चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूना कंटेनर पार्क केला होता. रात्रीच्या अंधारात मागून येणाऱ्या कंटेनर चालकाला अंदाज न आल्याने त्याने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता त्यात त्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुनील कुमार असे अपघातात मयत झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चुकीने पार्क केलेल्या कंटेनर चालक विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.
नागपूर: सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या आणि पतीला केवळ आपल्या दोघांचा संसार करण्यासाठी बाध्य करू पाहणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चपराक बसली.
बीड : राजकारण आणि सत्ता या समीकरणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घडी अजूनही बसलेली नाही. विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर यांना अद्यापही राजकीय सूर सापडलेला नाही.
माझ्या मागण्या मान्य झाल्या असून राजकीय वेगळी भूमिका काहीच नसल्याचे उत्तर भाजप आमदार केचे यांनी दिले आहे.निधी परत घेण्याची बाबच नव्हती. कार्यादेश निघालेला निधी परत घेण्याचा प्रश्नच नाही.
धुळे – शहरातील देवपूर भागासह अल्पसंख्यांकबहुल भागात १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वात देवपुरातील महिलांनी महानगर पालिकेवर हंडा मोर्चा आणला. तर, समाजवादी पक्षानेही महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहराची ‘क्राईम सीटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. त्यात आता सर्वाधिक बालगुन्हेगारसुद्धा नागपुरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपराजधानीत ४६७ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल .
मुंबई: उकाड्यापासून बचाव करण्यासाठी प्रवासी तिकिटासाठी जादा पैसे मोजून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत आहेत. मात्र, वातानुकूलित यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
मुंबई : मुंबईतील रखडलेल्या ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठोस पावले उचलली आहेत. ३० खासगी विकासकांची यादी तयार करण्यात आली असून या बाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
पुणे: कौटुंबिक कारणावरुन पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर घरात राहिलेल्या धनादेश पुस्तिकेवर बनावट सही करुन बँक खात्यातून पाच लाख ८५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
“काही प्रमाणात आपण सर्वच मनोरुग्ण असतो आणि आपल्यातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज असते,” असे मत जेष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. ते पुण्यात परिवर्तन संस्थेच्या किरण गटाने आयोजित केलेल्या 'रंग मनाचे' या कार्यक्रमात बोलत होते. जागतिक स्किझोफ्रेनियादिवसाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्किझोफ्रेनिया आजाराचा सामना करत असलेल्या मुलामुलींनी या कार्क्रमात गाणी, कविता, नृत्य यांचे बहारदार सादरीकरण केले. ज्येष्ठ लेखक राजन खान व रंगकर्मी अतुल पेठे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
जळगाव – जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाचवेळी दोन मातांची प्रसूती झाल्यानंतर परिचारिकेकडून पालकांना दिलेल्या चुकीच्या निरोपामुळे गोंधळ उडाला होता. अखेर डीएनए चाचणी झाल्यानंतर मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित अहवाल प्राप्त झाला आणि नवजात शिशूंना मातांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे दोन्ही माता भावूक झाल्या.
पुणे : हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी खास करुन शासकीय कार्यालयाबाहेर विना हेल्मेट दुचाकी चालकावर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
नागपूर : मान्सूनच्या एक महिनाआधीच “मोका” चक्रीवादळाने आपला मोर्चा वळवला होता. या चक्रीवादळमुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण असे काही झाले नाही.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात राजकीय परिस्थितीची आढावा घेतला. डॉ. चेतन नरके यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी केली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे, यासाठी दीड वर्षांपासून हेलपाटे मारणाऱ्या महिलेला उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन येताच अवघ्या चार दिवसांत महापालिकेत नोकरी मिळाली.
नागपूर: महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार अर्थखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे सोपवण्यात आल्याने यापुढे मेट्रोचा कारभार मुंबईतूनच चालणार की पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर : भिवापूरमधील पेट्रोल पंपवर लुटमार करून पंपमालकाच्या हत्याकांडाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. वडिलांचे बाहेर तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध तसेच घरी आई व बहिणीला मारहाण करीत शारीरीक व मानसिक त्रास देणाऱ्या वडिलाचा ५ लाखांची सुपारी देऊन खून करण्यात आला.
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महानिर्मितीच्या कोराडीमध्ये प्रस्तावित १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रकल्पाला विरोध करत २९ मे रोजीची भर दुपारची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नागपूर : ‘साशा’, ‘उदय’ आणि ‘दक्षा’ यांच्यानंतर मंगळवारी अवघ्या दोन महिन्याच्या बछड्यानेही जीव गमावला. कुनो राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी तो एक होता. अवघ्या दोन महिन्यात चार चित्ते कुनोने गमावले आहेत.
वाशीम : मालेगाव शहरात चार दिवसापूर्वी खताच्या पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना आढळून आले होते. याचा शोध घेत असताना धक्कादायक प्रकार समोर आला असून निर्दयी बापानेच पोटच्या लेकीला ठार करून तिच्या शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने खताच्या पोत्यात टाकून नालीत फेकून दिले होते.
ठाणे: नौपाडा येथे एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणीनौपाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नौपाडा भागात वृद्धा राहते. रविवारी त्या नातवासोबत परिसरातून पायी जात होत्या.
नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आता नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ ऐवजी ८ वरून सुटणार आहे.त्यामुळे प्रवाशांना ‘कार-टू-कोच प्रिमियम’ सुविधा मिळणार आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानंतर वंदेभारत एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे या दरम्यान पाच किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.
पुणे : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर आणि परिसरात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. मात्र, असे कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. त्यामुळे हा संदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…