Marathi News Today, 24 May 2023 : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. राजकीय भेटीगाठीही वाढल्या आहेत. शिंदे गटातील काही आमदार आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
Maharashtra News Today : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
दोन वर्षांपूर्वी ज्या प्रकारचे प्रस्ताव माझ्याकडे आले त्यात मी जर तडजोड केली असती, तर माझ्यावर कारवाई झाली नसती, पण दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार पडलं असतं.
– अनिल देशमुख (माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार)
नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३८५ पोलीस कर्मचाऱ्यांना थेट पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. त्यामुळे राज्य पोलीस दलात आनंदी-आनंद असे वातावरण आहे. पोलिसांची पदोन्नती रखडल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती, हे विशेष.
नाशिक – नाशिकची वाटचाल देशाच्या रसद (लाॅजिस्टिक) केंद्राकडे सुरू असून त्यास बळ देण्यासाठी नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय ऑटो अँड लॉजिस्टिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
महाविद्यालयातील आरक्षित जागांवर प्रवेश घ्यायचा असो किंवा शासकीय सेवेत आरक्षित जागांवर नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ असो, अशा व अशाच प्रकारच्या तत्सम बाबींसाठी जात आणि जातवैधता प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्रे तयार करणे किचकट प्रक्रिया असली तरी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. पालकांना याबाबतची माहिती नसल्याने ऐन वेळी त्यांची धावपळ उडते. अनेकदा महाविद्यालयीन प्रवेश अडतो, नोकरीच्या ठिकाणीही अडचणी येतात.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या महिला-मुलींना मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याची भीतीही व्यक्त केली. काही एजंट नोकरीचं आमिष देऊन या महिला-मुलींना आखाती देशात नेतात आणि तिथं त्यांचे मोबाईल-कागदपत्रे जमा केली जातात, असाही आरोप रुपाली चाकणकर यांनी केला. त्या ठाण्यात जनसुनावणी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या.
राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…