– देवेश गोंडाणे

महाविद्यालयातील आरक्षित जागांवर प्रवेश घ्यायचा असो किंवा शासकीय सेवेत आरक्षित जागांवर नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ असो, अशा व अशाच प्रकारच्या तत्सम बाबींसाठी जात आणि जातवैधता प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्रे तयार करणे किचकट प्रक्रिया असली तरी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. पालकांना याबाबतची माहिती नसल्याने ऐन वेळी त्यांची धावपळ उडते. अनेकदा महाविद्यालयीन प्रवेश अडतो, नोकरीच्या ठिकाणीही अडचणी येतात.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र
IGI Aviation Bharti 2024
१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! IGI एव्हिएशनकडून १०७४ जागांसाठी भरती, एवढा मिळणार पगार

जातवैधता प्रमाणपत्राची गरज काय?

अनु. जाती, जमाती, विमुक्त व भटके, इतर मागासवर्गीय आदी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकीय, मत्स्य, विधि शाखा, ललित कला आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असल्यास जात व जातवैधता प्रमाणपत्राची गरज आहे. याशिवाय आरक्षणाच्या आधारे शासकीय नोकरीत रुजू होण्यासाठीसुद्धा हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ते आधीच तयार करून ठेवणे सोयीचे असते. याशिवाय आरक्षित जागांवर निवडणूक लढवण्यासाठीही या प्रमाणपत्राची गरज भासते.

जात प्रमाणपत्र कुठे काढावे?

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. यासाठी अर्जदाराच्या पूर्वजांचे वास्तव्य एका निश्चित तारखेस ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी प्रमाणपत्र काढावे लागते. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास १० ऑगस्ट १९५० पूर्वी अर्जदाराचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्याच ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरिता १३ ऑक्टोबर १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वी ज्या ठिकाणी पूर्वजांचे वास्तव्य होते तेथे जातीचे प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.

जात प्रमाणपत्रात कुठल्या चुका टाळाव्यात?

जात प्रमाणपत्र काढताना अनेक बाबी काळजीपूर्वक तपासणे गरजेचे असते. प्रमाणपत्रावरील जातीचा नामोल्लेख हा अचूक असावा. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर किंवा १० वीच्या शिक्षण मंडळाच्या प्रमाणपत्रावर असलेल्या जातीच्या नोंदीनुसारच ‘स्पेलिंग’प्रमाणेच प्रमाणपत्रावरही जातीचा उल्लेख असावा. तसेच प्रमाणपत्रावर ‘महसूल क्रमांक’ नमूद असावा, प्रमाणपत्र दिल्याची तारीख, ‘स्पेलिंग’ व जातीचा प्रवर्ग अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. यात काही त्रुटी असेल तर ज्या कार्यालयाकडून प्रमाणपत्र प्राप्त केले, त्याच कार्यालयातून दुरुस्ती करून घ्यावी व त्याची पडताळणी करावी.

जातवैधता प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया काय?

एकदा जात प्रमाणपत्र काढल्यावर त्याची वैधता सिद्ध करण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र काढावे लागते. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता करावयाचा अर्ज http://www.barti.evalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा लागतो. तो करताना अर्जदाराला मूळ कागदपत्रे अपलोड करावयाची असतात. सर्वप्रथम अर्जदाराने जातीचे मूळ प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांच्या शाळेचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास शपथपत्र, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा शिक्षित असल्यास त्यांचे प्राथमिक शाळेचे दाखले अथवा दाखलखारीत उतारा, महसूलविषयक पुरावे उपलब्ध असल्यास अधिकार अभिलेख पंजी, जुने खरेदी-विक्रीपत्र, कर आकारणी पावती, याव्यतिरिक्त असा कुठलाही पुरावा जो अर्जदाराच्या प्रवर्गानुसार मानीव दिनांकाच्या कालावधी दर्शवतो व ज्यावर वास्तव्याचे गाव व जात नमूद आहे, असा पुरावा अपलोड करावा व प्रस्तावासोबत संलग्न करावा.

हेही वाचा : विश्लेषण: न्यायालयीन कामकाज, फौजदारी प्रक्रियेत जातीचा उल्लेख नकोच; सर्वोच्च न्यायालयाने का सुनावले?

प्रस्तावासोबत कोणते शपथपत्र देणे आवश्यक आहे?

जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावासोबत दोन शपथपत्र जोडणे आवश्यक आहे. ते साध्या कागदावर लिहिलेले व नोंदणीकृत असावे. दुसरे शपथपत्र नमुना ३ नियम ४ नुसार कुटुंबाची वंशावळ असते. संलग्न कागदपत्रांमध्ये वंशावळीमध्ये उल्लेख असावा.