Kusumagraj Birth Anniversary Marathi Bhasha Diwas 2025 Celebration Highlights : प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. वि.वा. शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि मानवतावादी होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबीसारख्या सामाजिक दुष्कृत्यांबद्दल बरेच लिखाण केले आहे. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या. मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Marathi Bhasha Gaurav Din 2025 Highlights, 27 February 2025 : मराठी भाषा गौरव दिनासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
Marathi Bhasha Din 2025 : जाणून घ्या मराठी राजभाषा गौरव दिनाचा इतिहास आणि महत्त्व
१९९९ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकसत्ताने नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाबद्दल काही प्रश्न देखील विचारले.
Marathi Bhasha Gaurav Din 2025: “मी वाट बघतोय…”, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा, मुबईकरांना केलं ‘हे’ आवाहन!
सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचं उदघाट्न झाल्यावर काही प्रथितयश मान्यवर त्यांच्या आवडीची एक मराठी कविता वाचून दाखवणार आहेत. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण हे समाज माध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर होईल. पण माझी मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सर्व मराठी भाषिक बंधु-भगिनींना विनंती आहे की या पुस्तक प्रदर्शनाला जरूर भेट द्या. आपण वाचाल तर वाचाल असं म्हणतो पण हे सत्य आहे. आपण जितकी आपली भाषा वाचू, तितकं त्यात सकस साहित्य निर्माण होत राहील, नवीन विचार होत राहील. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाला जरूर भेट द्या. वाट बघतोय. पुन्हा एकदा सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
Marathi Bhasha Din 2025: सुप्रिया सुळेंनी मराठी भाषा दिनानिमित्त शेअर केली कुसुमाग्रजांची कविता!
महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्ताने या ज्ञानपीठ विजेत्या महान साहित्यिकास वंदन.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.
नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.
हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा
– कवी कुसुमाग्रज
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा….!
महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्ताने या ज्ञानपीठ विजेत्या महान साहित्यिकास वंदन.
— Supriya Sule (@supriya_sule) February 27, 2025
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.
हिच्या कुशीत… pic.twitter.com/jXjyU8JPOp
Marathi Bhasha Din 2025: मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
सन्मान मराठी भाषेचा
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) February 27, 2025
गौरव मायबोलीचा!
मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!#मराठी_भाषा_गौरव_दिन pic.twitter.com/Fo49HTJGQN
कुसुमाग्रजांवरील प्रेमासाठी…मराठी भाषेच्या प्रसारासाठी; नाशिकमधील कुसुमाग्रज मराठी विचार मंचचा उपक्रम, पाच हजार विद्यार्थी सन्मानित
मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये, तर मराठी भाषेचा रोजच गौरव होण्याची सध्याची गरज आहे.
Marathi Bhasha Din 2025 : महानगरपालिकेत मराठी भाषा पंधरवड्याला सुरुवात, यंदा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रमुख वक्ते म्हणून निवड
महानगरपालिका प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मराठी भाषा पंधरवड्याला २७ फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे दुपारी ३ वाजता महानगरपालिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी भूषविणार आहेत.
नाशिक ग्रंथोत्सव सुरुवात गुरुवार पासून
Marathi Bhasha Gaurav Din 2025 Highlights, 27 February 2025 : मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!