Markadwadi EVM Updates : राज्यात नकुत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएमबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. गेल्या आठवड्यात माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, प्रशासनाने या मतदानाला परवानगी नाकारली. यानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी यामागे अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबाचा हात असल्याचा आरोप केला होता. यासह सातपुतेंनी माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान राम सातपुतेंच्या या आरोपांना उत्तर देताना उत्तम जानकर म्हणाले, “राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं डबडं आहे आणि ते वाजतच राहणार आहे.” या सर्व प्रकरणावर उत्तम जानकर यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार उत्तम जानकरांचे प्रत्युत्तर

राम सातपुते यांच्या आरोपांना उत्तर देताना उत्तम जानकर म्हणाले, “राम सातपुते हा खुळा माणूस आहे. मारकडवाडीत विकास काम केली आहेत. मग, मॉक पोलिंगला ते का घाबरत आहेत. मी कारखाना विकला असे, ते म्हणत आहेत. कारखाना व्यवस्थित चालू आहे. राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे डबडे आहे. ते वाजतच राहणार आहे.”

हे ही वाचा : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…

काय म्हणाले होते राम सातपुते?

राष्ट्रवादीची काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज ईव्हीएम विरोधात आवाज उठवणाऱ्या मारकडवाडी गावाला भेट दिली. त्यापूर्वी, शरद पवार मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला येणार असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी म्हटले होते. तसेच शरद पवार यांनी अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था आणि लुटलेल्या जमीनीही पाहाव्यात. यासह उत्तम जानकरांनी चांदापुरीचा विकलेला कारखानाही पाहावा, असे म्हटले होते.

हे ही वाचा : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?

राहुल गांधींकडूनही मारकडवाडीची दखल

विधानसभेच्या निकालानंतर मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांनी पतपत्रिकेवर मॉक पोल घेण्याची तयारी केली होती. याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तसेच गावातील काही लोकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. या सर्व प्रकराची लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दखल घेत, मारकडवाडी येऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकणार असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markadwadi mock polling on ballot paper mla uttam jankar former mla ram satpute mohite patil aam