आज देहू याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तुकाराम महाराज मंदिराच्या विश्वस्तांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. पण यावेळी अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर आता देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाषणाबाबत मला देखील कोणतीच कल्पना नव्हती. दिल्लीमध्ये भाषण कोणाचे होणार हे प्रोटोकॉलनुसार ठरलं होतं. मात्र वारकरी संप्रदायच्या कार्यक्रमात कोणतंही राजकारण येऊ नये असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू न देणे महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे
देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हे समजताच ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा- PM Modi Maharashtra Visit : “…म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी”; PM मोदींच्या देहू दौऱ्यात फडणवीसांचे उद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi pune visit sant tukaram maharaj dehu ajit pawar was prevented from speaking kjp 91 rmm