Devednra Fadnavis on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी नुकतंच तुकोबारायांचं दर्शन घेऊन व्यासपीठावर दाखल झाले आहेत. यावेळी व्यासपीठावरून आपलं मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

“तुकाराम महाराजांच्या शब्दांच्या धनात इतकी ताकद होती, की ते शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेनं बंद करा. पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतलं. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray criticize Prime Minister Narendra Modi in amravati
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…

‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न; सुरक्षा यंत्रणांवर भडकले उद्धव ठाकरे

त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, “वारकऱ्यांमध्ये कुणी मोठं नसतं, कुणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात, आपले पंतप्रधान ‘प्रधानसेवक’ आहेत. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सर्वांना सांगतो. तेच काम मोदी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी जे पसायदान मागितलं, संपूर्ण जग आपलं आहे, हा संदेश दिला. नरेंद्र मोदी यांनी देखील करोना काळात संपूर्ण जगाला लसीकरणाचा पुरवठा केला. मोदी यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.