Raigad Rainfall 73 Percent : रायगड जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि. ८ ) वार्षिक सरासरीच्या यंदा ७३ टक्के पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी , जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे विभागाच्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. मे महिन्यात मान्सून पूर्व पावसांच्या सरी रायगडकरांच्या पथ्यावर पडल्या आहेत.

रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३ हजार १४८ मिलीमीटर आहे. जिल्ह्यात १० सप्टेंबर पर्यंत २ हजार ३२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ७३.७ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्यात सरासारीपेक्षा जास्त पाऊस पडला. परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६५५ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ६९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडला. जूलै महिन्यात जिल्ह्यात साधारणपणे १ हजार २०६ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा जुलै महिन्यात ७६३ मिलीमीटर पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरीच्या ६३.३ टक्के पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ८७४ मिलीपाऊस पडतो. यावर्षी त्यातुलनेत ७४४ मिमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात ८५.२ टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात पुन्हा आतापर्यन्त २१ टक्के पाऊस नोदंवला गेला आहे. एकूण पर्जन्य मानाच्या ७३ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्याचे अजून २० दिवस बाकी आहेत . अजूनही पाऊस पडू शकतो. त्यामुळे यंदा पर्जन्य मानाच्या ९० टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जाता आहे.

शासनाकडे जून ते संप्टेंबर या चार महिन्यांच्या मानसूनचा पाऊस म्हणून नोंद केली जाते . यंदा मे महिन्यातच मॉन्सूनला सुरूवात झाली. मे महिन्यात ४५४ मिमी पाऊस पडला. १४.६७ टक्के पाऊस पडला होता. मे महिन्यात पडलेल्या पावसाचा विचार केल्यास एकूण आतापर्यन्त रायगड जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस पडला आहे.

यंदा दक्षिण रायगडच्या तुलनेत उत्तर रायगडात जास्त पाऊस पडला आहे. उरण तालक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. उरण तालुक्यात १०३ टक्के पाऊस पडला आहे. अलिबाग तालुक्यात ९८ टक्के पनवेल तालुक्यात ८० टक्के, पेण तालुक्यात ९२ क्के पाऊस पडला आहे. पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा या तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. नैसर्गिक आपत्तीचा तालुका म्हणून ओळखला जाणार्‍या महाड तालुक्यात यंदा कमी पाऊस पडला आहे. महाड तालुक्यात ७२ टक्के पाऊस पडला आहे.

धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला असल्याने लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ लघुप्रकल्पांपैकी २५ लघुप्रकल्प पूर्णपणे भरले आहेत. त्याचबारोबर शेतीसाठी देखील पुरक पाऊस पडला आहे.

कोकणातील जिल्हा निहाय पडलेला

कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यात ९० टक्के पाऊस पडला आहे. रायगमध्ये ७२, टक्के, रत्नगिरीत ८६ टक्के, सिुधुदुर्गमध्ये ८७ टक्के तर पालधरमध्ये ९४ टक्के पाऊस पडला आहे. कोकणात एकूण पर्जन्यमानाच्या ८५ टक्के पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी : अलिबाग ९८ , पनवेल ८०, कर्जत ६३ , खालापूर ७९, उरण १०३, सुधागड ७३, पेण ९२, महाड ७२, माणगाव ६९ , रोहा ८४, पोलादपूर ६३ , मुरूड ९२, श्रीवर्धन ८३, म्हसळा ८३, तळा ८२. एकूण : ७३ टक्के.