वाई:प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी न जाता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजासाठी काम करावे असे केंद्रीय  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साताऱ्यात सांगितले. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा अपमान करत आहे.त्यांना आघाडीमध्ये घ्यायचे की नाही घ्यायचे यावरूनही त्यांच्यामध्ये मतभेद आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अजित पवारांची ‘शेवटची निवडणूक’वरून सारवासारव अन् जितेंद्र आव्हाडांकडून चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “जाऊ द्या कधीतरी…”

प्रकाश आंबेडकर हे दलित समाजातील मोठे नेते आहेत. त्यांना सर्वत्र सन्मान आहे. त्यांनी महाविकास आघाडीत न जाता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये यावे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजासाठी काम करावे असे त्यांनी सांगितले. मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाचे काम करत आहे. त्यांनी मला मंत्रिमंडळात संधी दिली आहे. अनेक लोक संविधान अडचणीत असल्याचे सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संविधान बळकट करत आहेत. त्यामुळे असे बोलणाऱ्या लोकांच्या मताला काही महत्त्व द्यायचे काम नाही.

हेही वाचा >>> उजनी धरण पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे; पुण्यातून पाणी न सोडण्याची अजित पवारांची भूमिका

पोलीस ठाण्यात गोळीबार  झालेल प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात संबंधित आमदारांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात कायदा कायद्याचे काम करेल असे त्यांनी सांगितले. राज्यात आणि केंद्रामध्ये आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही जिल्हा नियोजन मंडळ पासून महामंडळांपर्यंत मध्ये प्रतिनिधीत्व मिळायला हवे असे त्यांनी सांगितले.खा.उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे यावेळी करण्यात स्वागत आले. यावेळी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale appeal prakash ambedkar to work under the leadership of pm modi zws