Sana Malik on Nawab Malik : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) २२ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यामुळे अनुशक्तीनगर मतदारसंघात त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची लेक सना मलिक या कार्यरत राहिल्या. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच, त्यांच्या पक्षातील लोकांनीच त्यांना त्रास दिल्याचंही त्यांनी सांगितलं. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“२०१७ ला मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यानंतर अनुशक्ती नगरमध्ये मी जास्त कार्यरत झाले. विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहे, पण २०१७ ज्याप्रमाणे नवीन होते, तशी आता नवीन नाही”, असं सना मलिक म्हणाल्या.

“आमच्या कठीण काळात अजित पवारांनी आम्हाला साथ दिली. तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. या क्षेत्रातील प्रत्येक समस्येवर मला अजित पवारांनी मदत केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पूर्ण ताकदीने आम्हाला साथ दिली. दादांनी जो शब्द दिला तो पूर्ण केलाय”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : “मी ऑन कॅमेरा सांगतेय की…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पक्षातील लोकांनी त्रास दिला

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. लोक म्हणतात की जून २०२२ ला सरकार पडलं. पण आमच्यासाठी फेब्रुवारीतच सरकार कोसळलं होतं. राष्ट्रवादी पक्षात २०२३ मध्ये फुटली. पण अनुशक्ती नगरमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्येच हे सर्व झालं होतं. आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की नवाब मलिक जसं काम करत आहेत, तसंच मी करावं. त्यानुसार मी काम सुरू केलं. तेव्हा आमचे विरोधकच नाही तर आमच्या पक्षातील लोकांनीही मला खूप त्रास दिला. प्रत्येक गोष्टीत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. अशा काही गोष्टी केल्या ज्या करायला नव्हत्या पाहिजे. मी वुमेन कार्ड प्ले करत नाही”, अशी तक्रारही त्यांनी बोलून दाखवली.

“माझे वडील फक्त कामाच्या आधारवर मते मागतात. लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुमच्याविरोधात कोण आहे याचा फरक पडत नाही. निवडणुकीत जनताच राजा असते. त्यामुळे राजाने तुम्हाला साथ दिली की तुमच्याविरोधात कोण उभं आहे याचा फरक पडत नाही”, असंही सना मलिक म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana malik on ncp split anushaktinagar maharashtra assembly 2024 sgk