मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि इकडे बाळासाहेब चोरले. या चोर वृत्तीला मतदान करणार का? २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. ते खेडमधील गोळीबार मैदानात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. माझ्याबरोबर महाराष्ट्र होता. आपलं जागतिक कौतुक झालं, ते माझं नाही महाराष्ट्राचं कौतुक होतं. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही.”

हेही वाचा : “…तुम्ही संगामाचं काय चाटत आहात?,” उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर घणाघात

“त्यांना भगव्याचे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणूक आयोग नाही. मिंधेंच्या हातात धनुष्यबाण तरीही चेहरा पडलेला आहे. पण, ‘मेरा खानदान चोर है,’ हे कधीच पुसलं जाणार नाही,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.

हेही वाचा : “भुरटे, गद्दार आणि तोतय्ये नाव चोरू शकतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

“यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attacks eknath shinde in khed sabha over shivsena mahavikas govt ssa