वाशिम जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीने स्थानिक राजकीय समीकरणंच बदलली आहेत. ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज (६ ऑक्टोबर) महाविकासआघाडीला वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मदतीची गरज राहिली नाही हे स्पष्ट झालं. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आला आहे. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५२ सदस्य संख्या आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेसकडे १०, शिवसेनेकडे ६ आणि वंचित आघाडीकडे ७ जागा होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीला वंचितची मदत घ्यावी लागली. मात्र, आज झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं वंचित आघाडीची गरज राहिलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा वाढून आता संख्याबळ १४ झालं आहे. काँग्रेसची एक जागा वाढून 11 जागा झाल्या आहेत. शिवसेना 6 जागांवर कायम असल्याने जिल्ह्यात एकूण 52 जागांपैकी आघाडीकडे 31 जागा झाल्यात. त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. बदललेल्या आकडेवारीनुसार आता राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद भेटणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आज झालेल्या मतमोजणीत बहुजन वंचित आघाडीच्या आणि जनविकास आघाडीच्या २ जागा कमी झाल्या. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला झाला आहे. त्यामुळं एकंदरीतच महाविकास आघाडी जिल्ह्यात सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे.

Maharashtra ZP Election Results 2021: कोणी मारली बाजी तर कोणाचा सुपडा साफ; जाणून घ्या संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

” जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही “

शिवसेनेचे विजयी उमेदवार सुरेश मापारी म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार भावना गवळी, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनतेला विकासाची गंगा त्यांच्या मतदारसंघात आणेल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे जनतेने मला भरमसाठ प्रेम दिलं. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि मी एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात गेलो तरी जिल्ह्यात सर्वात मोठ्या फरकाने जनतेने मला निवडून दिलं. या जनतेच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांचा विकास करत राहिल.”

वाशिम जिल्हा परिषद विजयी उमेदवार (एकूण जागा : 14)

१. काटा : संध्या देशमुख : काँग्रेस
२. पार्डी टकमोर : सरस्वती चौधरी : अपक्ष
३. उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना
४. आसेगाव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी
५. कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी
६. दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस
७. फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप
८. कुपटा : उमेश ठाकरे : भाजप
९. तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी
१०. कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस
११. गोभणी : पूजाताई भुतेकर : जनविकास
१२. भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी
१३. पांगरी नवघरे : लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित
१४. भामदेवी : वैशाली लळे : वंचित

जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतरनिकाल जाहीरएकूण जागा
अकोला१४१४
धुळे१५१५
नंदूरबार११११
नागपूर१६१६
पालघर१५१५
वाशिम१४१४
एकूण२३१२१७१७१६८५८५
जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल २०२१