शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘यारों का टशन’ आणि ‘पटियाला बेब्स’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला अभिनेता अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या अभिनेता अनिरूद्धचा करोनाशी लढा सुरू होता. अखेर त्याने आज करोनावर यशस्वी मात केलीय.
अभिनेता अनिरूद्ध दवे हा मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये वेब शोसाठी शूटिंगमध्ये होता. त्यानंतर 23 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्याला भोपाळच्या एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या फुप्फुसात ८० ते ९० टक्के इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या फुप्फुसातील इन्फेक्शन रोखण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू होती.
अभिनेता अनिरूद्ध दवे आयसीयूमध्ये भरती झाल्याची बातमी मिळताच तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली. अखेर त्याच्या चाहत्यांनी केलेली प्रार्थना फळाला आली आणि दोन आठवड्यातच त्याने करोनावर यशस्वी मात केली. तो करोनातून बाहेर पडला असला तरी आणखी काही दिवस त्याला रूग्णालयातच रहावं लागणार असल्याचं बोललं जातंय.
अभिनेता अनिरूद्ध दवे याचा मित्र रोशन गैरी याने ही माहिती दिली असून अनिरूद्धला आयसीयूमधून आता प्रायव्हेट रूममध्ये हलवण्यात आलं असल्याचं देखील त्याने सांगितलं. अनिरूद्ध दवे ची प्रकृती इतकी बिघडली होती की त्याला त्याच्या मित्रांसोबत व्हिडीओ कॉलवरही बोलता येत नव्हतं. परंतू आता करोनातून बाहेर पडल्यानंतर तो मित्रांशी व्हिडीओ कॉलवर बोलू लागला आहे.
अनिरुद्धने राजकुमार आर्यन, वो रहनेवाली महलों की, मेरा नाम करेगी रोशन, फुलवा अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांमध्ये काम करण्याशिवाय अनिरुद्धने अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मा स्टारर फिल्म ‘पटियाला हाऊस’ मध्येही काम केले होते. याशिवाय तेरे संग आणि शोरगुल सारख्या चित्रपटांमध्येही तो दिसला आहे.