भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) आत्महत्या केली. २५ वर्षीय आकांक्षाने गळफास घेत जीवन संपवलं. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आकांक्षाचा मृतदेह सापडला. तिच्या आत्महत्येने भोजपुरी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. आत्महत्येनंतर आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. आकांक्षाच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून गळफास घेतल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड समर सिंहवर गंभीर आरोप केले होते. आकांक्षाच्या आईने समरवर अभिनेत्रीची हत्या केल्याचा आरोप केला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालातून आकांक्षाने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, समर सिंहने ब्रेकअप केल्यामुळे नैराश्यात जाऊन आकांक्षाने जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणी समर सिंहला अटक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा>> राघव चड्ढा यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओला परिणीती चोप्राने केलं लाइक; नेटकरी म्हणाले “लग्नाची तारीख…”

आकांक्षाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या समर सिंहला कठोर शिक्षा देण्याची मागणी तिच्या आईने केली आहे. आजतकशी बोलताना आकांक्षाची आईने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे. “योगी सरकारने माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. समर सिंह व संजय सिंहला फाशीची शिक्षा मिळायला हवी. माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. समर सिंह व संजय सिंहने तिची हत्या केली आहे. समर सिंह आकांक्षाला अन्य कोणाबरोबरही काम करू द्यायचा नाही. फक्त त्याच्याबरोबरच काम करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणायचा” असं आकांक्षाची आई म्हणाली.

हेही वाचा>> “मी संसार टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले, पण…” समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य, म्हणाली “नागाचैत्यनबरोबर घटस्फोट घेण्याचा…”

आकांक्षाचे भोजपुरी गायक व अभिनेता समर सिंहबरोबर प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहत असल्याची चर्चा आहे. व्हॅलेंटाइन डेला आकांक्षाने समर सिंहबरोबर फोटो शेअर करत प्रेमाची कबुलीही दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akanksha dubey suicide case actress mother request cm yogi adityanath to hang samar singh kak
Show comments