आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. चित्रपटाचं advance booking जोरदार झालं असून नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बाहेर यायला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने दुसऱ्या दिवशी ४१.२५ ते ४३.१५ कोटी कमावले आहेत. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७९ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने ३७.५०कोटींचा व्यवसाय केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास ६९.५० कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचा बोलबाला दक्षिणेतील राज्यांमध्येदेखील आहे. दक्षिणेतील प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केली आहे. Sacnilk Entertainment यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दक्षिणेतील राज्यांच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटक राज्यात ३.२ कोटी, आंध्रप्रदेश तेलंगणा राज्य मिळून ५.५ कोटी तर तामिळनाडू राज्यात १. ९० कोटी आणि केरळ राज्यात ०..६० कोटी इतके पैसे कमावले आहेत.

ब्रह्मास्त्र’चे शोज आता ‘या’ वेळेतही? प्रेक्षकांच्या मागणीला जोर

हा चित्रपट येत्या ३ दिवसात १०० कोटी हा आकडा पार करेल असं म्हंटलं जात आहे. येत्या सोमवारपर्यंत या आकड्यांमध्ये आणखीन वाढ होऊ शकेल. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’कडे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तसा बराच कालावधी आहे. सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागल्याने या कमाईच्या आकड्यावर परिणाम होऊ शकतो असंही म्हंटलं जात आहे.

‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातील सर्वात मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जात आहे. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ‘शिवा’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.