‘बिग बॉस १५’चे ओटीटी व्हर्जनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शो मध्ये प्रत्येक स्पर्धक स्वत:चे स्थान या शो मध्ये कायम करण्यासाठी लढताना दिसत आहे. या शो मधील सर्वात चर्चित स्पर्धकांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी. शमिता बिग बॉसच्या घरात जाण्या पूर्वीपासून चर्चेत होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली असून ती आता ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र राज कुंद्रा प्रकरणाचा त्रास शमिताला होताना दिसत आहे. यामुळे आता शिल्पाने धाकटी बहीण शमितासाठी एक खास मेसेज पाठवला आहे.
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये काल रक्षाबंधानचा सण साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी सर्व स्पर्धकांना आपल्या बहीण-भावांकडून एक खास व्हिडीओ मेसेज देण्यात आला. हिना खान बिग बॉसची एक्स स्पर्धकने हा मेसेज घरातील सदस्यांना दिला. घरातील सगळीच मंडळी भावुक झाली. तसेच या कठीण काळात ही शिल्पाने मेसेज पाठवला हे पाहून शमिता भावूक झाली आणि तिचे अश्रु अनावर झाले. या व्हिडीओत शिल्पा बहीणीला प्रोत्साहन देताना म्हणली की, “तू खूप छान खेळत आहेस. अजून छान खेळायला हवं तसचं आपली भूमिका सोडू नकोस.” आईच्या प्रकृतीबद्दल सांगताना शिल्पाने सांगितले की, “सगळं व्यवस्थीत आहे काळजी करू नकोस.”
रक्षाबंधन निमित्ताने शिल्पाने पाठवलेला हा व्हिडीओ पाहून शमिता भावूक झाली होती. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिताची स्ट्रॉंग भूमिका सगळ्यांना दिसून आली. ती प्रत्येक चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहे.’बिग बॉस १५’ ओटीटी व्हर्जन प्रेक्षकांना आवडले असून काही दिवसांपूर्वी याचा टीव्ही व्हर्जनचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये नेहमी प्रमाणे सलमान खान एका अनोख्या अंदाजात दिसून आला. तसंच हा नवीन प्रोमो पाहून ओटीटी सोबत ‘बिग बॉस’च्या टीव्ही व्हर्जनमध्ये नवीन काय बघायला मिळणार याची उत्कंठा लागून राहिली आहे.
शिल्पा शेट्टी बद्दल बोलायचे झाले तर पती राज कुंद्राच्या अटके नंतर ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेली नाही. एवढंच नाही तर ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’या रिअॅलिटी शोमध्ये देखील उपस्थित नव्हती. नंतर जवळ जवळ एक महिन्यानी ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या सेटवर परतली आहे.