‘बिग बॉस’चा १५ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या वर्षी ‘बिग बॉस’ आपल्याला दोन वेगवेगळ्या माध्यमांवर पहायला मिळणार आहे. पहिले काही आठवडे हा सिझन वूट या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. त्यानंतर हा सिझन टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘बिग बॉस’च्या नवीन सिझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात कोण स्पर्धक दिसणार? याची उत्कंठा सगळ्यांना आहे. या शोसाठी दिवसेंदिवस एक एक स्पर्धकांची नावं जाहीर होत आहेत. आता या यादीत छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रिद्धिमा पंडितचं नाव देखील सामील झालं असून नुकताच तिच्या एन्ट्रीचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
नुकताच रिद्धिमा पंडितचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली आहे. या प्रोमोमध्ये रिद्धिमाचा कॉन्फिडन्स आणि बोल्ड अंदाज बघायला मिळतो आहे. तसंच बघताक्षणी कळते की ती हा शो जिंकाण्यासाठी आली आहे. रिद्धिमाचा हा प्रोमो शेअर करत एक कॅप्शन लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, “छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाल्यावर आता रिद्धिमा बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनमध्ये सामील होणार आहे.” या प्रोमोची सुरूवात एका आवाजाने होते. यात रिद्धिमा बद्दल माहिती देतं तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तसंच जेव्हा एक पत्रकार तिला प्रश्न विचारतो की, “तुम्ही इतर स्पर्धकांना काय सांगू इच्छित आहात?” यावर ती म्हणते की, “बिग बॉस ओटीटीच्या विजेत्यापासून सांभाळून राहा.” आणि “सगळे नक्की माझ्या प्रेमात पडतील.” असे ही तिने या प्रोमोमध्ये सांगितले.
रिद्धिमा पंडितला ‘बहू हमारी रजनीकांत’या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती ‘हम’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. तिने कलर्सवरील लोकप्रिय स्टंट बेस शो ‘खतरों के खिलाडी’मधे देखील सहभाग घेतला होता. ज्यात ती फायनल्सपर्यंत पोहचली होती. रिद्धिमा पंडितने एका मुलाखतीत ‘बिग बॉस’मधे सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आता ती लवकरच ‘बिग बॉस’ १५ च्या ओटीटी व्हर्जनमध्ये झळकणार आहे.
‘बिग बॉस’च्या ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निर्माता करण जोहर करणार आहे. नंतर टीव्हीवर ही जबाबदारी सलमान खान स्वीकारताना दिसेल. ‘बिग बॉस’ १५ ओटीटी व्हर्जन ८ ऑगस्ट म्हणजे उद्या पासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल.