Aamir Khan girlfriend Gauri Spratt : दोन वेळा घटस्फोटित असलेल्या आमिर खानने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली ६० व्या वाढदिवशी दिली. माध्यमांबरोबर वाढदिवस साजरा करताना त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. गौरी स्प्रॅट असं आमिरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. गौरी मूळची बेंगळुरूची असून ती व आमिर मागील दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिरने गौरीबरोबरचं नातं जाहीर केल्यावर सगळीकडे तिचीच चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, गौरीच्या सोशल मीडिया अकाउंटबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

आमिर खानच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गौरीने एक खास प्लॅन शेअर केला होता. पण वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आमिरने गौरीची ओळख करून दिली. त्यानंतर गौरीच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले. त्यामुळे गौरीने तिचे पिंटरेस्ट अकाउंट डिलीट किंवा हाइड केले आहे.

गौरीचे अकाउंट पिंटरेस्ट प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. एक तर ते डिलिट केले आहे किंवा प्रायव्हेट केले आहे, असं तिथे दिलंय. आमिर खानसाठी गौरीने वाढदिवसाचा प्लॅन शेअर केला होता, त्यानंतर काही तासांतच हे घडले. तिच्या पिंटरेस्ट पोस्टमध्ये सुंदर लाइट्स, ताजी फुलं आणि बोनफायरसह आउटडोअर डिनरचा उल्लेख करण्यात आला होता.

“Aamir 60th Dinner” असं लिहून गौरीने पोस्ट केली होती. त्यात डिनर टेबल सुंदर ताज्या फुलांनी व स्ट्रिंग लाइट्सनी सजवलेला होता. दुसऱ्या एका पोस्टमध्ये हे दोघेही लाइट्स लावलेल्या झाडाखाली डान्स करताना दिसत होते. आमिरने गौरीचं नाव जाहीर गेल्यानंतर गौरीच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने तिची पोस्टची ‘पब्लिक व्ह्यू’ सेटिंग हटवली. गौरीने अकाउंट डिलिट केलं की प्रायव्हेट केलं, त्याबाबत स्पष्टता नाही.

आमिर खान व गौरी एकमेकांना दीड वर्षापासून डेट करत आहेत, मात्र त्याबद्दल कुणालाच कळणार नाही याची पूर्णपणे काळजी त्यांनी घेतली होती. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही त्याने पापाराझींना गौरीचा फोटो न काढण्याची विनंती केली होती. गौरी अजूनही बॉलीवूडमध्ये रुळली नसल्याचं आमिर तिची ओळख करून देताना म्हणाला.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट ही बंगळुरूची आहे. ती आमिर खान फिल्म्समध्ये काम करते. ती हेअरड्रेसिंग शिकली आहे. तसेच तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये कोर्स केला आहे. गौरीची आई तमिळ तर वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. ती सहा वर्षांच्या मुलाची आई आहे. आमिरने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याशी गौरीची ओळख करून दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan girlfriend gauri spratt remove her social media account after actor confirms dating hrc