बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी आराध्या देखील अनेकदा लक्ष वेधून घेत असते. आता आराध्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेली कृती पाहून सर्वजण तिचा कौतुक करत आहोत.
आराध्या बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. चित्रपटांच्या या ग्लॅमरस दुनियेपासून पासून दूर राहून आराध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. अनेकदा ते तिच्या आई-वडिलांबरोबर एअरपोर्टवर तसेच विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असते. आता तिचा असाच एक एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.
आराध्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्येही तिच्या आई-वडिलांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याबरोबर बाहेर गावाहून ती मुंबईत परत आली. आराध्याने एअरपोर्टवर येतात तिथे उपस्थित सर्व मीडिया फोटोग्राफर्सना हात जोडून नमस्कार केला. तिच्या या कृतीने सर्वांचं चांगलंच लक्ष वेधलं. आता नेटकरी तिच्या या कृतीचं आणि अभिषेक ऐश्वर्या यांनी तिच्यावर केलेल्या संस्कारांचं कौतुक करत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “आराध्या किती नम्र आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तिने मीडिया फोटोग्राफर्सना दिलेली ही वागणूक खूप कौतुकास्पद आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “ही भविष्यातील स्टार आहे.”